Fake ED officers raids Zaveri Bazaar : मुंबईच्या झवेरी बाजारातून सर्वात मोठी बातमी. अभिनेता अक्षय कुमार याचा सिनेमा 'स्पेशल 26' (Special 26) सारखीच लूट झवेरी बाजारात करण्यात आली आहे. (Zaveri Bazaar Loot ) चार अज्ञात व्यक्तींकडून बोगस ईडी अधिकारी (Fake ED Officers) असल्याचे भासवत एका व्यापाऱ्याच्या दुकानावर धाड टाकण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार व्यापाऱ्याच्या ऑफिसमधल्या एका कर्मचाऱ्याला बेड्याही ठोकण्यात आल्या. (Fake ED officers raids Zaveri Bazaar in Mumbai)


फिल्मी स्टाईलने चोरट्यांनी 25 लाखांची रोखड लुटली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोगस अधिकाऱ्यांनी ऑफिसची झाडाझडती घेतली. ऑफिसमधून 25 लाख रुपयांची रोकड आणि 3 किलो सोनं जप्त करुन ते पसार झाले.  लूट करण्यात आलेल्या सोन्याची किंमत एक कोटी 70 लाख असल्याचे सांगितले जात आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने या बोगस ईडी अधिकाऱ्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


दोन संशियत व्यक्तींना पोलिसांनी घेतले ताब्यात 


या मोठ्या चोरीच्या घटनेची शहरात चर्चा होत असून सोने व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. फिल्मी स्टाईलने चोरट्यांनी तब्बल 25 लाखांची रोखड लुटण्यात आली आहे. पोलिसांना गुंगारा देऊन बोगस ED अधिखाऱ्यांनी ही लूट केल्याने पोलीस प्रशासन देखील हादरले आहे. दरम्यान, या लुटीप्रकरणी दोन संशियत व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोघांची गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्यास दोघांवर अटकेची कारवाई होईल. यात आता पोलीस देखील सिनेमात दाखवल्याप्रमाणे आरोपींचा शोध घेतील का? आणि या घटनेचा शेवट देखील फिल्मी असेल का, याची चर्चा होत आहे.



आरोपींनी तक्रारदार व्यावसायिकाच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यालाही हातकडी घातल्याचे सूत्रांनी सांगितले. यानंतर आरोपींनी कार्यालयातून 25 लाख रुपये रोख आणि तीन किलो सोने चोरुन नेले. सोन्याची एकूण किंमत एक कोटी 70 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 394, 506 (2) आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.