COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मंत्रालयासमोर भाजीपाला फेकणाऱ्या उस्मानबादच्या शेतकऱ्यानं भाजीपाला फेकला. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली. पण त्यामागे आता मनसे आणि शिवसेनेतली चढाओढ कारणीभूत असल्याचं पुढे आलंय.


शिवसेनचे स्थानिक नेते योगेश भोईर यांनी मनसेच्या नावाखाली शेतकऱ्यांनी दुकान थाटल्यानं कारवाई केल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केलाय. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी कांदिवलीचे सहाय्यक अभियंते राजेश आक्रे यांच्याशी फोनवरून संभाषणातून हे उघड होत. संदीप देशपांडे आणि राजेश आक्रे यांच्यातील संभाषणाची क्लिप झी २४ तासच्या हाती लागलीय.


कांदिवलीत आठवडी बाजार चालवण्यास अडथळे निर्माण केल्याबद्दल भाजप सरकारचा जाहीर निषेध करणाऱ्या उस्मानाबाद मधील शेतकऱ्यांच्या पाठीशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उभे राहिलेत. स्थानिक महापालिका अधिकारी आणि राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी त्रास देत असल्याची या शेतकऱ्यांची तक्रार आहे.


मंत्राल्यासमोर आपला शेतमाल फेकून या शेतकऱ्यांनी आपला सरकारविरोधातला संताप शुक्रवारी व्यक्त केला होता. या शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची शनिवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. रेल्वेची हद्द सोडून तुम्ही तुमचा व्यवसाय करा, मनसे तुमच्या पाठीशी आहे असं ठाकरे यांनी या शेतकऱ्यांना सांगितलं.