मुंबई : कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकऱ्यांचे झालेले मृत्यू हे सरकारने केलेल्या हत्या असून सरकार प्रशासन शेतकऱयांचे जीव वाचविण्यासाठी अद्यापही गंभीर नाही, त्यामुळं मुख्यमंत्र्यांवर ३०२ नुसार हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेत ४ सदस्यीय आमदारांचे पथक यवतमाळ मध्ये दाखल झाले. यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, अमित झनक हे आमदार या पथकात आहेत. 


जिल्हा रुग्णालयात त्यांनी विषबाधित रुग्णांची विचारपूस केली. यावेळी घाण दुर्गंधी सोबतच रुग्णांना बेड अभावी खाली झोपवून उपचार केल्या जात असल्याचे आणि रुग्णांना औषधी मिळत नसल्याचे निदर्शनास आल्याने आमदारांनी सहपालकमंत्री संजय राठोड यांच्यासमक्ष अधिष्ठातांची झाडाझडती घेतली. 


कृषी राज्यमंत्र्यानी निर्देश देऊनही डीन, कृषी साहित्य विक्रेते, कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले नाही, त्यामुळं सरकारचा दोषी अधिकाऱ्यांवर धाक नाही त्यांची कारवाई करण्याची औकात नाही. त्यामुळं काँग्रेस या सरकारविरुद्ध एल्गार पुकारून धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही असा इशारा आमदारांनी दिला.