मुंबई : मुंबईतल्या मालाड झोपु घोटाळा प्रकरणी निवृत्त आयएएस अधिकारी विश्वास पाटील यांच्या पत्नी चंद्रसेना पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीला, मुंबई हायकोर्टानं नकार दिला आहे.


मालाड झोपु घोटाळा प्रकरणात विश्वास पाटील, चंद्रसेना पाटील आणि दोन विकासकांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयानं दिले होते. त्याविरोधात चंद्रसेना पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कोणतंही कारण न देता उच्च न्यायालयानं त्यांच्या अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिलाय. त्यामुळे आता पाटील यांना दुस-या खंडपीठासमोर अपील करावं लागणार आहे.