मुंबई : मुंबई सारख्या शहरात राहण्याचं आकर्षण कोणाला नाही. मुंबई प्रत्येकाला आपल्या कुशीत सामावून घेते. इथे कधीच कोणी उपाशी झोपू शकत नाही हे देखील तितकंच खरंय. पण अशा मुंबईत घरांच्या आणि जागेच्या किंमती आभाळला टेकल्या आहेत. सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेल्या मुंबईत अनेकांची स्वप्न पूर्ण झाली. पण मुंबईत घर घेणं पण आता स्वप्न झालंय.


इतक्या कोटींचा फ्लॅट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतल्या वरळी परिसरात नुकताच एक फ्लॅट तब्बल साडे त्रेपन्न कोटी रुपयांना विकत घेण्यात आला. समुद्राकडे तोंड असणाऱ्या या फ्लॅटसाठी नव्या मालकानं 2 लाख 30 हजार रुपये प्रति चौरस फुटाचा भाव मोजला आहे. एकूण 2 हजार 300 चौरस फुटाच्या या फ्लॅटचे नवे मालक शहा कुटुंबिय आणि क्वांटिको रिअॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक निलेश सुतार यांच्यात गेल्या आठवड्यात व्यवहार पूर्ण झाला.  व्यवहार पूर्ण होण्याआधी शाह कुटुंबियानी सरकारी तिजोरीत तब्बल 2 कोटी 67 लाखांचं मुद्रांक शुल्कही भरलं आहे.


पाहा व्हिडिओ