Ganesh Visarjan 2023 : लालबाग परळ गणेशोत्सवाची पंढरी म्हणून ओळखल जात मुंबईतील जुनी आणि प्रसिद्ध गणेश मंडळ मुंबईतील याच परिसरात आहेत. दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज जड अंत करणारे गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार. बाप्पाला निरोप देण्यासाठी लालबाग परळ परिसरामध्ये मोठा जनसमुदाय लोटतो. ढोल ताशाच्या गजरामध्ये गाजत वाजत मोठ्या जल्लोषात बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढली जाते. बाप्पाला निरोप देण्यासाठी तरुणाई मोठी गर्दी करत असते. शिवाय या प्रसिद्ध गणेश मंडळातून बाप्पाच्या मूर्ती बाहेर पडल्यानंतर बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्त आतुरतेने बाहेर उभे असतात. हे सर्व चित्र आता काही तासांनीच मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे. 


मुंबईतील दोन प्रसिद्ध गणेश मंडळाचे कसे असणार आहे विसर्जन नियोजन? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गल्ली, मुंबईचा राजा 
विसर्जन सोहळा आरती - 8.00 वाजता
विसर्जन मिरवणुक सुरुवात - 8.15 वाजता 
पहिली पुष्पवृष्टी  8.30 वाजता 
मुख्य प्रवेशद्वार कार्यक्रम 12 वाजता 


हेसुद्धा वाचा : Ganesh Visarjan 2023 LIVE: निरोप घेतो देवा...; दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पा निघाले गावाला 


 


मंडळाच्या वतीनं यंदा ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून उत्सव मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज हयांना गणेशोत्सवामध्ये शिवराज्याभिषेक देखावा सादर करुन शिवरायांना अभिवादन केले होते. तसेच यंदा मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीमध्ये देखील छत्रपतींच्या विचारांनी सामाजिक प्रबोधन कारण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी विसर्जनादरम्यान मुंबईचा राजा च्या मुख्य प्रवेशद्वारा समोर एक अनोखा आकर्षक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. त्यामध्ये शिवराय प्रकट होऊन सामाजिक प्रबोधन देतानाचे सादरीकरण होणार आहे. नंतर ढोल ताशांच्या गजरात आणि जनसागराच्या उपस्थितीत मुंबईचा राजा विसर्जनाकरिता गिरगांव चौपटीकडे मार्गस्थ होईल. 



तिथं 90 व्या वर्षीच्या उत्सवाची सांगता करत नव्या वर्षाकडे आशावादी नजरेनं पाहणाऱ्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून बाप्पाची विसर्जन मिरवणूक गणेशगल्लीच्या गणपतीनंतर सुरु होणार असून, सकाळी 10  वाजता लालबागच्या राजाची आरती होणार आहे. तर, त्यानंतर तासाभरानं म्हणजेच सकाळी 11 वाजता लालबागच्या राजाची मिरवणुक शाही थाटात लालबाग मार्केटमधून निघणार आहे. यावेळी कोळी बांधवांसह भक्तांचा जनसागर लोटल्याचं पाहायला मिळेल. शुक्रवारी सकाळी 6 वाजता गिरगाव चौपाटीवर लालबागाच्या राजाचं आगमन होणार असून, त्यानंतर आरती करून विसर्जन सोहळा सुरू होणार आहे. 



राजा तेजुकायाचा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या गणेशोत्सव मंडळांकडूनही बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास निघणार असून, तिथून परळमधून नरेपार्क- परळचा राजा, लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पोस्टगल्लीचा राजा असे बाप्पा गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहेत.