सलग तिसऱ्या दिवशी सोनं घसरलं, सोन्याचा आजचा भाव
जागतिक स्तरावर सोन्याला सराफांकडून कमी मागणी होत आहे.
मुंबई : जागतिकस्तरावर सोन्याला सराफांकडून कमी मागणी होत आहे. दिल्ली सराफ बाजारात देखील बुधवारी सोन्याचा भाव घसरला. सोन्याचा भाव ५० रूपयाने घसरला, यामुळे सोने प्रति १० ग्रँम, ३१ हजार ९५० रूपयांवर येऊन पोहाचलं. याआधी सोन्याचा भाव २ दिवसांपूर्वी १५० रूपयांनी घसरला होता. तर चांदीचा भावही कमी झालाय. प्रति किलोग्रँम ३७ हजार ८०० रूपयांवर आला आहे.
सोने व्यावसायिकांनी सांगितलं, डॅालरच्या रूपयाच्या तुलनेत मजबूत झाल्याने, सोन्याची मागणी कमी झाली. त्यामुळे मागणी घटली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूरमध्ये ०.०५ टक्के सोनं घसरलंय, तर सिंगापूरमध्ये सोने १,२२१.५० डॅालर प्रति औसंने खाली आलंय.
चांदी १४.५० डॅालरवर येऊन थांबले. सध्याच्या बाजारात स्थानिक आभूषण निर्मात्यांची मागणी कमी झाल्याने सोन्याचा भाव पडला आहे.