मुंबई : Maharashtra political crisis : राज्यपाल आजारी आहेत. त्यांना बरं वाटू दे. नंतर संख्याबळाचे बघू. सत्ता येते आणि जाते. त्यामुळे सत्तेची चिंता नाही. जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल. मात्र, महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. पत्ताच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असं काहींना वाटत आहे. एकनाथ शिंदे हे पूर्वीपासून आमचे आहेत. ते कायम शिवसेनेत राहतील, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. समज गैरसमज झाले असतील तर ते दूर होतील. आम्ही सकाळपासून चर्चा करत आहोत. आमच्यात चांगली चर्चा झाली. त्यांच्या काहीही मागण्या नाहीत. त्यांच्याकाहीही अटी नाहीत. शिंदे यांचा पक्षाशी संवाद कायम आहे. ते शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेत राहतील, असे राऊत म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार स्वगृही परत येतील. आज एकनाथ शिंदे यांच्याशी माझ फोनवर बोलण झाले आहे. मी याबद्दची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे.  काही समज आणि गैरसमज दूर हेतील. 56 वर्षात शिवसेनेने अनेकदा संकटातून, राखेतून  फिनिक्स झेप घेतली आहे. त्यांनी कोणत्याही अटी शर्ती घातलेल्या नाहीत.गुवाहाटीला काझीयारंगा  जंगल खूप सुंदर आहे. आमदारांनी पर्यटन करावे देशभर फिरावे. शिवसेना कधीही पाठिमागून वार करत नाही आणि करणार नाही, असे राऊत म्हणाले.


राज्यातील राजकीय भूकंपाच्या धर्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक आज बोलावली आहे. (Maharashtra political crisis: CM Thackeray calls cabinet meeting today ) दुपारी एक वाजता होणाऱ्या या बैठकीत काय निर्णय होणार याकडेच लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याचे राजकारण पूरते ढवळून निघाले आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या आमदारांना घेऊन सूरतला पोहोचहलेले शिंदे आज पहाटे विशेष विमानाने 40 आमदारांसह गुवाहाटीला पोहोचले आहेत.


आपला वेगळा गट हीच शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. स्वतःचा वेगळा गट स्थापन करण्याची एकनाथ शिंदे यांनी तयारी केलीय. स्वतःचा वेगळा गट स्थापन करून त्याची माहिती शिंदे राज्यपालांना देणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. आज दुपारीच हा फॅक्स पाठवला जाईल अशी शक्यता आहे. शिवसेनेनं कालच शिंदेंना गटनेतेपदावरून हटवलं आहे. आता स्वतःचा गट हाच शिवसेना असल्याचं सांगत मोठा राजकीय भूकंप घडवण्याची शिंदे यांची तयारी आहे.