दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  राज्यातील पोलीस दलासाठी खुशखबर आहे. राज्यातील पोलीसांच्या आहार भत्यात सहा वर्षांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही वाढ दुप्पटीने असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निर्णयानुसार  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरिक्षक आणि फोटोग्राफर यांना आता ८४० रूपयांऐवजी आता १ हजार ५०० रूपये आहार भत्ता दिला जाणार आहे. 


तर  पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक यांना आता ७०० रूपयांऐवजी १ हजार ३५० रूपये तर आहार भत्ता दिला जाणार आहे. 


यापूर्वी २०११ साली पोलीसांच्या आहार भत्त्यात वाढ करण्यात आली होती.  गृहखातं असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेवून राज्यातील पोलीसांना महत्त्वाची भेट दिली आहे. 


पोलीसांना सलग १२-१२ तास तर कधी त्यापेक्षाही जास्त तास ड्युटी करावी लागते. अशा वेळी हा आहारभत्ता तुटपुंजा होता. त्यामुळी ही वाढ महत्त्वपूर्ण आहे.