दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुंबईकरांना खूश करणारा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. मुंबईच्या पाणीपुरवठ्याची क्षमता वाढवण्यासाठी भातसा धरणाचा विस्तार करण्याबरोबरच, नवे डेहरजी धरण बांधण्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी महत्त्वपूर्ण असलेल्या भातसा धरणाचा विस्तार केला जाणार आहे. या धरणाची क्षमता अडीच टीएमसीने वाढवली जाणार असून यासाठी राज्य सरकार 325 कोटी रुपये खर्च करणार आहे. 


यातील पाण्याचा जास्त वाटा हा मुंबईला मिळणार असून ठाणे आणि भिवंडीला यातील काही प्रमाणात पाणी दिलं जाणार आहे. तर नव्याने बांधल्या जाणाऱ्या डेहरजी धरणाचे पाणी मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रातील शहरांना मिळणार आहे. या धरणासाठीचा खर्च एमएमआरडीए उचलणार आहे.