मुंबई : Hearing in the High Court on the plea of Anil Deshmukh : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख जेल बाहेर येणार का, याची चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होत आहे. कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी  माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या जेलमध्ये आहेत. विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज याआधी फेटाळला होता. अनिल देशमुख यांना EDने 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशमुख यांचा आर्थिक गैरव्यवहारात सहभाग आहे, हे दर्शविणारे भक्कम पुरावे  EDकडे आहेत, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. साक्षीदारांच्या जबाबात तफावत असली तरी या टप्प्यावर ते तपासू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवित विशेष न्यायालयाचे न्या. आर. एन. रोकडे यांनी अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.


देशमुख यांनी नियमित जामीनासाठी अर्ज केला होता. त्याआधी त्यांनी आपसुक जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तांत्रिक कारणास्तव तो फेटाळण्यात आला. आपण तपास यंत्रणेचेच बळी आहोत. काही स्वार्थी लोकांच्या हातून आपली छळवणूक करण्यात येत आहे. काही अधिकारी सत्ता आणि अधिकारांचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेला छेद देऊन दहशतीचे राज्य  निर्माण केले आहे, असे त्यांनी आपल्या जामीन अर्जात म्हटले होते. 


EDने देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनिल देशमुख मुख्य सूत्रधार असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले आहे. देशमुख यांच्या आदेशावरुन निलंबित पोलीस सचिन वाझे याने  बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून खंडणी उकळली, असा ईडीने युक्तिवाद केला आहे. गृहमंत्री असताना त्यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.