मुंबई : विधानसभा निवडणूक २०१९  साठी महाराष्ट्रात २८८ जागांवर मतदान सुरु आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत भांडुप मतदारसंघात मतदान केलं. मतदान केल्यानंतर, संजय राऊत यांनी महाराष्ट्राची ईच्छा असेल तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील अशी प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. वरळीच्या मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. आदित्य ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी वांद्रे येथील मतदारसंघात मतदान केलं. 


यावेळी उद्धव ठाकरे यांना कमी मतदान होत असल्याने जनतेला काय सांगाल? या प्रश्नावर त्यांनी यांनी जनतेला घराबाहेर पडून मतदान करण्याचं, आणि केवळ तुमच्यासाठी नाही तर उज्ज्वल महाराष्ट्रासाठी मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. तर आदित्य ठाकरेंनी या प्रश्नाचं उत्तर देताना, आज मला कोणताही प्रश्न विचारु नका, माझ्यासाठी प्रार्थना करा असं ते म्हणाले.



आदित्य ठाकरेंनी मतदान करण्यापूर्वी सिद्धिविनायक येथे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.


महाराष्ट्रात भाजपा १५० जागांवर आणि शिवसेना १२४ जागांवर निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेस १४७ जागा आणि राष्ट्रवादी १२१ जागांवर निवडणूक लढवतायेत.


महाराष्ट्रातील २८८ जागांवर ३ हजार २३७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी २३५ महिला उमेदवार आहेत. राज्यात एकूण ८ कोटी ९८ लाख मतदार आहेत. तर मतदानासाठी राज्यभरात ९६ हजार ६६१ मतदान केंद्र निर्माण करण्यात आली आहेत.