Heatwave in Maharashtra : राज्यातील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. कारण राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. एप्रिलच्या सुरुवातीला उन्हाचे तीव्र चटके बसणार आहेत. तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्याचं हवामान विभागाने केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय हवामान खात्याने (IMD) उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 30 मार्चपासून उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मुंबईसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आलेला नसला तरी, तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.


उत्तर भारताच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. बुधवारपासून 2 एप्रिलपर्यंत कमाल तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.


जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि लगतच्या उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेश आणि काही भागांसह कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील.