मुंबई : मुंबईवर असणारा मुसळधार पावसाचा धोका टळला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहिती नुसार यानंतर मुसळधार पावसाची शक्यता नाही. कालच्या तुलनेत आज पावसाची तीव्रता कमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असली, तरी आता इशा-याची तीव्रता मात्र कमी करण्यात आली आहे. मुंबई आणि परिसरात वातावरण ढगाळ राहिल त्याचप्रमाणे वेगात वारे वाहतील असंही हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असं सुधारित अंदाजात म्हटलं आहे.


तिकडे हायटाईटचा धोकाही आता दिवसभरात हळहळू कमी होत जाणार आहे. संध्याकाळी अरबी समुद्रात सहा नंतर ओहटी सुरू होणार. त्यामुळे पाणी साचण्याची शक्यताही कमी कमी होत जाणार आहे.