मुंबई : शहरात आज आज मोर्चेकरांचा आवाज घुमणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी तसेच महापालिका कर्मचारी मोर्चा काढणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभाराचे २३ जण बळी गेल्याने रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोर्चाची हाक दिलेतय. तर राज्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांची मानधन वाढीची मागणी आहे. तर महापालिका कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात मोर्चाची हाक दिलेय. 



रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधात मुंबईत गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महापालिका कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचारी अशा तीन मोठ्या संघटनांनी मोर्चाची हाक दिलेय. त्यामुळे मुंबईसाठी आजचा दिवसा हा मोर्चांचा ठरणार आहे. या मोर्चांमुळे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.


एल्फिन्स्टन पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीचा निषेध व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  आंदोलनाची घोषणा केलेली आहे. बुलेट ट्रेनला विरोध करत आधी रेल्वे प्रवाशांसाठी पुरेशा सोयी-सुविधा देण्याची  त्यांची मागणी आहे. दरम्यान, बुधवारी रात्रीपर्यंत मनसेला मोर्चा काढण्याची परवानगी पोलिसांनी दिलेली नव्हती.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मेट्रो सिनेमागृहासमोरून सकाळी ११.३० वाजता सुरु होणारा मोर्चा पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर धडक देईल. दरम्यान, मोर्चाला कोणतेही गालबोट न लावता शिस्तीत काढण्याचे आवाहन राज यांनी केले आहे.


महापालिका प्रशासनाविरोधात दंड


मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या तब्बल ४० मान्यताप्राप्त संघटनांनी एकत्र येत मुंबई मनपा आयुक्त अजय मेहता यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. सर्व संघटनांच्या मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने आयुक्तांविरोधात गुरुवारी महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चाचे आवाहन केले आहे. तसेच ४० हजार रुपये बोनसची मागणी कर्मचाऱ्यांनी केलेय.


अंगणवाडी सेविका मानधनवाढीची मागणी


जवळपास चार आठवड्यांपासून संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीही गुरुवारी सरकारविरोधात राज्यात जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईतही तीव्र आंदोलनाचा इशारा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे. अंगणवाडी सेविका संपाला शिवसेनेने पाठिंबा दिलाय. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता अधिक असणार आहे.