मुंबई : भायखळा येथील राणीची बाग अर्थात जिजामाता उद्यानातली शुल्कवाढ लागू करण्यात येत आहे. दरम्यान, याचा फटका फेरफटका मारणाऱ्यांनाही बसणार आहे. राणीबागेत सकाळी ६ ते ८ दरम्यान फेरफटका मारणाऱ्या १८ वर्षांवरील नागरिकांसाठी १५० रुपये प्रतिमहिना शुल्‍क आहे. तर ज्‍येष्‍ठ नागरिकांना मोफत प्रवेश देण्‍यात येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या नियमानुसार १२ वर्षाच्या आतल्या मुलांसाठी २५ रुपये तर १२ वर्षावरच्या सर्वांना १०० रुपये आकारण्यात येणार आहे. कुटुंबासोबत जिजामाता उद्यानात येणाऱ्यांसाठी खास एका खास तिकीट योजनेची सोय आहे. कुटुंबातील आई वडील आणि १२ वर्षाखालची दोन मुलं असे चौघांचे तिकीट १०० रुपयात मिळणार आहे. 


सरकारी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलींना जिजामाता उद्यानात मोफत प्रवेश मिळेल. खासगी शाळांतील तीन ते १२ वर्षाच्या मुलांना शैक्षणिक सहलीसाठी १५ रुपये तिकीटदर आकारण्यात येणार आहे. खासगी शाळांतील १३ वर्षांवरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी २५  रूपये मोजावे लागतील. महापालिका शाळांतील विद्यार्थी, ६० वर्षांवरील ज्‍येष्‍ठ आणि दिव्‍यांग व्‍यक्‍तींना विनामुल्‍य प्रवेश असेल.