मुंबई :  ध्वनी प्रदुषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी राजकारण्यांना फटकारलंय. ध्वनी प्रदुषणाचे नियम कसे मोडायचे याची स्पर्धाच राजकारण्यांमध्ये लागलीय अशी टीका अभय ओक यांनी केली. मुंबईत मुलुंड येथे भरलेल्या गिर्यारोहण संमेलनात मुख्य अतिथी म्हणून न्यायाधीश अभय ओक आले होते तेव्हा त्यांनी ही टीका केली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्यात गणेशोत्सव-दहिहंडी मंडळ यांची मुख्यमंत्र्याबरोबर बैठक झाली होती. सण साजरे करता यावेत यासाठी सायलेन्स झोनचे नियम शिथिल करण्याची मागणी या बैठकीत एकमुखाने करण्यात आली होती.


यावर सरकारनेही वेळ पडल्यास अध्यादेश काढणार असल्याचं सुतोवाच केले होते. तर दुसरीकडे शिवसेनेनेही सण दणक्यात साजरे करणार असल्याचं सांगितलंय. त्या पार्श्वभूमीवर न्यायाधीश अभय ओक यांनी ध्वनी प्रदुषणाबाबत केलेलं वक्तव्य महत्त्वाचं आहे.