Sharad Pawar : खारघर दुर्घटनेप्रकरणी न्यायालयीन चौकशीची (Judicial Inquiry) मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलीय. गर्दी जमवून वातावरण निर्मिती करण्याचा डाव होता असा आरोपही पवारांनी केला. तर देशातल्या तपास यंत्रणांचा गैरवापराविरोधात लढण्याची तयारी ठेवा असं सांगत पवारांनी संघर्षाची भूमिका घेण्याच्या सूचना राष्ट्रवादीला (NCP) दिल्या आहेत. खारघर दुर्घटनेत अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला असून याची सर्वस्वी जबाबदारी ही शिंदे-फडणवीस सरकारची (Shinde-Fadanvis Government) असल्याचा गंभीर आरोपही शरद पवार यांनी केला आहे. कड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कडक उन्हात कार्यक्रम महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा (Maharashta Bhushan Award) कार्यक्रम घेण्यात आला. पक्षाचं शिबीर उन्हाळ्यात घेताना काळजी घेता, मग या ठिकाणी काळजी का घेण्यात आली नव्हती असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसीठी एक सदस्यीय समितीकडून केली जाणार आहे. पण अधिकारी कितीही प्रामाणिक असला तरी तो राज्य सरकारच्या विरोधात अहवाल देत नाहीत. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडून करण्यात यावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. 


काही मोजक्या ठिकाणी पंडाल टाकण्यात आला होता. त्यांना प्रचंड शक्ती दाखवायची होती. बेफिकीरपणा दाखवला याची किंमत काही लोकांना मोजावी लागली असा आरोप शरद पवार यांनी केला.


अनिल देशमुख यांच्यावर आरोप होता की त्यांनी 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आणि आता आरोप पत्र दाखल झालं आहे त्यात लिहिलंय सव्वा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला. त्यांच्या शिक्षणं व्यवस्थेला 1 कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे आणि त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. नवाब मलिक यांच्या जामिन अर्जावरची सुनावणी किती दिवस पूढे जातेय. आता 15 दिवसाला तारीख पूढे ढकलली जाते. राष्ट्रीय पक्षाचा प्रवक्ता आहे म्हणुन त्यांना जेल मध्ये टाकण्यात आलं आहे, असा आरोपही शरद पवार यांनी केला.


संजय राउत यांना जेल मध्ये टाकण्यात आलं होतं. आपले एक सहकारी एकनाथ खडसे आहेत जळगावचे त्यांनी भाजप सोडलं म्हणुन त्यांच्या जावयाला तुरुंगात टाकण्यात आल आहे. त्यांचा जावई तुरुंगात आत्महत्या करेल अशी त्यांची परिस्थिती करण्यात आली आहे असंही शरद पवार म्हणाले.