कोरेगावर भीमा पडसाद : एसटीचे २० कोटींचे नुकसान
एसटीला भीमा-कोरेगावच्या घटनेमुळे झालेल्या आंदोलनात तब्बल २० कोटींचं नुकसान सहन करावं लागले आहे. तसेच राज्यभरात अनेक एसटी आणि शहर बस वाहतूक टार्गेट करण्यात आली.
मुंबई : एसटीला भीमा-कोरेगावच्या घटनेमुळे झालेल्या आंदोलनात तब्बल २० कोटींचं नुकसान सहन करावं लागले आहे. तसेच राज्यभरात अनेक एसटी आणि शहर बस वाहतूक टार्गेट करण्यात आली.
एसटी नुकसान सोसेल
राज्य परिवहन मंडळाचे आर्थिक नुकसान झालं असलं तरी आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा आदर राखत एसटीचं झालेलं नुकसान आंदोलनकर्त्यांकडून न घेता एसटी स्वत: सोसेल असं प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केलंय.
रावतेंची दिलगिरी
दरम्यान, महाराष्ट्र बंद आंदोलनाच्या काळात एसटीची वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवाशांचे जे अतोनात हाल झाले त्याबद्दल दिवाकर रावतेंनी दिलगिरी व्यक्त केलीय.