घरामागील संरक्षक भिंतीनेच केला घात, कुर्ल्यात 18 वर्षीय मुलीचा चिरडून मृत्यू
Kurla Protective Wall Collapses: मध्यावर असलेल्या प्रजापती कुटुंबाच्या घरावर भिंतीचा मोठा भाग कोसळला.यात वैष्णवी चिरडली गेली आणि जागीच तिचा मृत्यु झाला.
Kurla Protective Wall Collapses: कुर्ला पश्चिम येथील सुभाष नगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील चाळीवर भिंत कोसळल्याने परिसरात खळबळ माजली. या घटनेत एका 18 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवाावा लागला. सोमवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास सुभाष नगर येथील इमारतीच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळला आहे.ही संरक्षक भिंत खाली असलेल्या घरांवर पडली. अचानक झालेल्या या घटनेने नागरिक गोंधळून गेले. यामध्ये वैष्णवी प्रजापती या 18 वर्षीय तरुणीचा दुर्देवीरित्या मृत्यू झाला आहे.
सुभाष नगर येथील जैन सदन या इमारतीच्या संरक्षक भिंतीला लागून पाच घरे आहेत. यातील तीन घरांवर रात्री आठ वाजताच्या दरम्यान अचानक संरक्षक भिंत कोसळली. मध्यावर असलेल्या प्रजापती कुटुंबाच्या घरावर भिंतीचा मोठा भाग कोसळला.यात वैष्णवी चिरडली गेली आणि जागीच तिचा मृत्यु झाला.
गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांची घराच्या सोडतीसंदर्भात मोठी घोषणा
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून बचावकार्य करण्यात आले. वैष्णवी ला बाहेर काढून पालिकेच्या राजावाडी रुग्णालय पाठविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेत तीन घरांचे ही मोठे नुकसान झाले आहे.
आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलांची वारसा नोंद होणार रद्द, 'या' ग्रामपंचायतीने घेतला निर्णय
महापालिकेचा गणेशोत्सव मंडळांना धक्का
मुंबईत सध्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची (ganeshotsav 2023) जोरदार तयारी सुरु झाली आहे. मात्र त्याआधीच प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाने गणेश भक्तांना मोठा धक्का दिला आहे. मुंबई महापालिकेने (BMC) घेतलेल्या एका निर्णयामुळे गणेशभक्तांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. मुंबई किनारा मार्ग प्रकल्पातील पुलाचे (Mumbai Coastal Road Project) काम सुरू असल्याने वरळीतील गणेश घाटात (लोट्स जेट्टी) येथे गणेश मूर्तींचे विसर्जन (Ganesha idols) करण्यास मुंबई महापालिकेने बंदी घातली आहे. विसर्जन करताना भरतीवेळी दहा फुटांपेक्षा उंच गणेशमूर्तींमुळे पुलाच्या कामात समस्या निर्माण होऊ शकते असे कारण देत किनारा रस्ता प्रकल्प आणि मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागाने मनाई केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
वरळीसह लोअर परळ आदी भागांतील गणेश मंडळांमध्ये महापालिकेच्या या निर्णयाने नाराजी पसरली आहे. दुसरीकडे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनेही या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पालिकेच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. मुंबई महापालिकेने गणेश भक्तांना विसर्जनासाठी दुसरा पर्याय द्यावा, नाहीतर दहा फुटांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गणेश घाटातच करु, असा इशारा समितीने दिला आहे.