गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांची घराच्या सोडतीसंदर्भात मोठी घोषणा

Home For Mill Workers: एनटीसी मिलच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगारांना घरे कशी देता येतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत 1 लाख 74 हजार अर्ज आले आहेत. येत्या 3 महिन्यात यातील पात्र अपात्रचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

प्रविण दाभोळकर | Updated: Aug 21, 2023, 04:30 PM IST
गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्र्यांची घराच्या सोडतीसंदर्भात मोठी घोषणा

Home For Mill Workers: गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. गिरणी कामगारांसाठी लवकरच 5 हजार घरांची सोडत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपलं सरकार आल्यानंतर हजार घरे दिली. जे गिरणी कामगार गेली अनेक वर्षापासून घरापासून वंचित आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर घरे उपलब्ध करुन देणार आहोत. यासाठी संबंधित विभागांशी विविध पर्यायावर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

Add Zee News as a Preferred Source

म्युझियम जिथे होईल तिथे गिरणी कामगारांच्या वारसांना नोकऱ्या देण्यात येईल. जास्तीत जास्त प्रमाणात घरे कशी उपलब्ध करुन देता येतील याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

एनटीसी मिलच्या जागांवर मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगारांना घरे कशी देता येतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत 1 लाख 74 हजार अर्ज आले आहेत. येत्या 3 महिन्यात यातील पात्र अपात्रचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

पनवेल येथील घरांची डागडुजी करण्यासाठी म्हाडा आणि एमएमआरडीएला सूचना केल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More