राणी बागेतील लक्ष्मी हत्तीणीचे निधन
प्राणी संग्रहालयात दिसणार नाही लक्ष्मी
मुंबई : भायखळ्यामधील (Byculla Zoo) राणीची बाग (Ranichi Baug) म्हणजेच वीरमाता जिजामाता उद्यानातील लक्ष्मी हत्तीणीचे निधन झाले आहे. बिहार येथून आणलेल्या लक्ष्मी हत्तीणीचे (Laxmi Elephant) गुरूवारी निधन झाले आहे. लक्ष्मीचे वय झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे प्राणीसंग्रहालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, लक्ष्मीवर प्राणीसंग्रहालय परिसरात दफन करण्यात आले आहे.
गेल्या ९ महिन्यांपासून कोरोनामुळे भायखळा येथील विरजिजामाता प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद आहे. त्यामुळे सध्या प्राणीसंग्रहालयात पर्यटकांची वर्दळ नाही. लक्ष्मी ही हत्तीण १९७७ मध्ये बिहार मधून मुंबईत आणण्यात आली होती. गुरुवारी तीचे निधन झाले. काही दिवसांपासून तीची प्रकृती खालावलेली होती.
भायखळ्यामधील राणीची बाग म्हणजेच वीरमाता जिजामाता उद्यान आता पेंग्विन पाठोपाठ अॅनाकोंडाच्या (Anacondas) स्वागताच्या तयारीसाठीदेखील सज्ज झाले आहे. मूळची साऊथ अमेरिकेची असलेली अॅनाकोंडा ही सापाची जात म्हणजे जगातील सर्वात मोठा साप. राणीच्या बागेत अॅनाकोंडासाठी खास रेपटाईल पार्क बनवण्यात आलं आहे. आता केंद्रीय मंजुरीसाठी Central Zoo Authority प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यामध्ये भारत आणि परदेशातील 20 विविध सापांच्या जाती ठेवल्या जाणार आहेत.
1982साली राणीची बाग उभारण्यात आली आहे. त्यावेळेस 53 एकरवर असलेल्या राणीच्या बागेचं क्षेत्र काही वर्षांपूर्वी वाढवण्यात आले आहे. मफतलाल मिल्सची 7 एकर जागा पालिकेने विकत घेतली आहे.