मुंबई : लालबागच्या राजाही आता काही वेळात विसर्जनासाठी रवाना झाला आहे. १२ दिवस मंडपात भक्तांना आशीर्वाद दिल्यावर आता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेनं निघाला आहे. लालबागच्या राजाला पाहण्यासाठी तमाम मुंबईकरांनी गर्दी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लालबागच्या गल्लीतून बाहेर पडताना लालबागमधील स्थानिक रहिवाशांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. मुंबईतल्या प्रमुख गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका मोठ्या जल्लोषात निघालेल्या आहेत. लालबागच्या राजासोबतच तेजूकाया, परळच्या नरे पार्कचा राजा, लोअर परळचा महाराजा मोठ्या डौलात निघाला आहे.


मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गणेश गल्लीच्या गणपतीची मिरवणूक निघाली आहे. सकाळी आठच्या सुमारास राजाची आरती झाल्यावर मोठ्या झोकात गणेशगल्लीचा राजा गिरगावच्या दिशेनं मार्गस्थ झाला आहे.