सरसकट सर्वांनाच रेल्वे लोकल प्रवासाबाबत महत्वाची बातमी
Latest News on mumbai local train : सरसकट सर्वांनाच लोकल प्रवासाची ( local travel) परवानगी देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुंबई : Latest News on mumbai local train : सरसकट सर्वांनाच लोकल प्रवासाची ( local travel) परवानगी देण्यासंदर्भात राज्य सरकारच्या समितीची उद्या बैठक होणार आहे. यात सरसकट लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. (Important news for all about railway local travel in Mumbai)
मध्य आणि पश्चिम रेल्वेनेही त्यासाठी तयारी सुरू केली आहे. सर्व तिकीट खिडक्या सुरू करण्यासोबत एटीव्हिएमची संख्याही वाढवली जात आहे. मध्य रेल्वेवर 178 एटीव्हिएम सुरू करण्यात आली आहेत.
रेल्वेच्या मदतनीसांमार्फत सेवाही दिली जात आहे. कोरोना काळाआधी दोन्ही लोकल मार्गांवरून रोज 75 लाख प्रवासी प्रवास करत होते. 15 ऑगस्टनंतर दोन लसमात्रा घेतलेल्या प्रवासाची परवानगी देण्यात आली. त्यामुळे मध्य रेल्वेवर 35 लाख तर पश्चिम रेल्वेवर 28लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत.