मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं. या दरम्यान अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले. कोरोनाची परिस्थिती, लॉकडाऊनच्या काळात अनेकांचं आर्थिक गणित कोलमडल्याची स्थिती आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन एलआयसीने पॉलिसीधारकांना त्यांचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, विलंब शुल्क आकारली जाऊ नये, अशी विनंती भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप नेते आशिष शेलार यांनी एलआयसीचे चेअरमन एम.आर कुमार यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ देण्यासह, ज्येष्ठ नागरिकांना कागदपत्रांसाठी, तसंच हप्ते भरण्यासाठी स्वतंत्र सेल सुरु करुन घरपोच सेवा द्यावी, आर्थिक वर्षासाठी पॉलिसीधारकांद्वारे पॉलिसी प्रीमियमच्या विलंब देयकासाठी विलंब शुल्क आकारले जाऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे.


'परीक्षा तीन तासांची होणार नसून, ५० गुण आणि एक तासाची असेल'


एलआयसी पॉलिसीचे हप्ते वेळेत न भरल्यास भविष्यात मिळणाऱ्या फायद्यापासून नागरिक वंचित राहून त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एलआयसीने सध्याच्या परिस्थितीत काही सवलती देण्याची गरज असल्याचं शेलार यांनी सांगितलं.


दरम्यान, दुसरीकडे विज बिल कमी करण्याची भाजपकडून मागणी होत आहे. राज्यात महावितरणकडून भरमसाठ वीजबिले दिल्याने तीव्र नाराजी आहे. लॉकडाऊनमध्ये सरासरी वीज बिलं पाठविताना ती अव्वाच्यासव्वा पाठवली गेली. महावितरण आणि खासगी वीज वितरक कंपन्यांकडून विजबिलाच्या माध्यमातून लूट करण्यात आली आहे, असा आरोप करत लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे. वीज बिल कमी करावे, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.