Mumbai Local Mega Block Update : मुंबईत मस्त पाऊस पडतोय, त्यामुळे आज रविवारचा सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांनी घराबाहेर पडण्याचा विचार केला असेल, तर त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण मध्य रेल्वेकडून आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबईचा भार सांभाळणारी लोकल सेवा सुरळीत चालावी म्हणून रविवारी मध्य रेल्वे कडून अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यात येते. (local train sunday 16 july mega block central harbour western lines mumbai local news in marathi)


मध्य रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेमागावरील माटुंगा ते ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 .05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉक काळात सीएसटीहून सुटणाऱ्या लोकल माटुंगा ते ठाण्यातील मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. ही लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबले. तर ठाण्याहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल या  ठाणे-माटुंगा अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. ही लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या रेल्वे स्थानकांवर थांबेल. 


हार्बर रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक 


हार्बर लाईनवरील सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या काळात सीएसएमटी-वडाळा ते वाशी, बेलापूर-पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा बंद असणार आहे. तर सीएसएमटी ते वांद्रे आणि गोरेगाव अप आणि डाऊन लोकल धावणार नाहीत. 



पश्चिम रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉक


पश्चिम रेल्वेमार्गावरील बोरिवली ते राम मंदिर अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक आहे. या मार्गावरील लोकल सेवा या अंधेरी ते बोरिवली दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर अप आणि डाऊन जलद मार्गावरील अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. 


हेसुद्धा वाचा - Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागांमध्ये यलो अलर्ट, पुढील 4 दिवसात मुसळधार पाऊस