Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागांमध्ये यलो अलर्ट, पुढील 4 दिवसात मुसळधार पाऊस

Maharashtra Weather News : राज्यात पावसाचा जोर वाढला असून पुढील 4 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 16, 2023, 07:00 AM IST
Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागांमध्ये यलो अलर्ट, पुढील 4 दिवसात मुसळधार पाऊस  title=
rain news next 4 days 16 to 19 july heavy rainfall warning in maharashtra konkan marathwada and vidarbha pune mumbai weather rain forecast

Maharashtra Rain Updates : जुलै महिन्या अर्धा संपला तरी अजून पाऊस राज्यात हवा तसा सक्रीय झालेला नाही. राज्यातील (Maharashtra Monsoon Update Today)अनेक भागात अजून हवा तसा पाऊस न झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. शेतकऱ्यांचा पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र मुंबईसह उपनगर, ठाणे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुढील 4 दिवस राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Maharashtra Weather Alert) 

येत्या 4 दिवसांमध्ये म्हणजे आजपासून 19 जुलै दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागने दिला आहे. मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार आहे. पुणे वेधशाळेचे महासंचाक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. दरम्यान जुलैअखेर मान्सून राज्यातील सरासरी भरून काढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

पुणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्गातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  

हवामान खात्याकडून राज्यासाठी 5 दिवसांचा येलो अलर्ट जारी केला असून 17 जुलैला रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (rain news next 4 days 16 to 19 july heavy rainfall warning in maharashtra konkan marathwada and vidarbha pune mumbai weather rain forecast)

राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

 

परभणी जिल्ह्यात आठवडाभरानंतर पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. शनिवारी सकाळपासूनच शहरात आभाळ झाकोळून आलं होतं. तर दुपारी 4 वाजण्याच्या सुमाराला परभणी शहरात पावसानं हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिक आनंदले. मात्र जिल्ह्याला अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. 

पुणे जिल्ह्याच्या इंदापूरमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे काही अंशी शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. इंदापुरात पावसानं ओढ दिली असून, उजनी धरणानंही तळ गाठलाय. अशा परिस्थितीत रिमझीम पावसाचाही आता शेतक-यांना मोठा आधार वाटू लागलाय.