Eknath Shinde: महाराष्ट्रामध्ये महायुती 45 चा आकडा पार करणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रासह देशात विरोधकांकडे आत्मविश्वास नाहीय. आम्ही पंतप्रधानांचे हात मजबूत करु, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी शंभुराज देसाई आणि उदय सामंत त्यांच्यासोबत उपस्थित होते. आता आचारसंहिता सुरु झालीय. सरकारने जी काम केली त्यांचे लोकार्पण केले, या कामात आम्ही व्यस्त होतो. महायुतीने केलेले काम आपल्यासमोर आले. शेतकरी, कामगार, महिला,उद्योग या सर्वात महाराष्ट्राने आघाडी घेतली. मेट्रो, अटल सेतू अशी अनेक कामे झाली तर अनेक प्रगतीपथावर आहेत. राज्याच्या कामाबद्दल मी समाधानी आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल चांगले मत तयार झालंय. याचा फायदा आम्हाला येत्या निवडणुकीत याचा फायदा नक्की होईल. लोकांना हवं ते देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरातील निराश झालेले लोक राहुल गांधींच्या सभेत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासमोर ही सभा झाली हा काळा दिवस आहे. हिंदुत्व विचारधारेविरुद्ध बोलणाऱ्यांसोबत ठाकरे बसले. 'माझ्या तमाम हिंदु बांधवांनो' हा शब्द गायब झाला. बाळासाहेबांचे धोरण, विचार सोडला म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असे ते म्हणाले. त्यांना बोलायला 5 मिनिट दिली त्यावरुन त्यांची पत कळाली, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.  50 वर्षात जे झालं नाही ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवलं. देशाती अर्थव्यवस्था 11 वरुन 5 वर आणली. आता 3 वर आणायची आहे. 


विश्वास गमावलेला विरोधी पक्ष म्हणजे इंडिया अलायन्स आहे. फक्त मोदी द्वेष त्यांच्या भाषणातून दिसत होता. साडेतीन शक्ती पीठ, नारी शक्ती हे संपवणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी राहुल गांधींना विचारला. 


मनसे सोबत येणार?


महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत येणार का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला.  राज ठाकरे हिंदुत्ववादी विचारांचे आहेत. आमचे विचार सारखे आहेत. नक्कीच योग्य निर्णय होईल, असे ते म्हणाले. 


आम्ही खरच डीलर


सर्व डीलर असल्याची टीका शिंदे गटावर विरोधकांकडून केली जाते. यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. हो, आम्ही खरच डीलर आहोत...आम्ही डील केली शेतकरी, महिलांना न्याय देण्यासाठी डील केली, असे मुख्यमंत्री म्हणाले. 


शिवतारेंसोबत बोलणं झालं


शिवतारे यांच्या सोबत माझं बोलणं झालं आहे.. त्यांची मी समजूत काढली आहे. शिवतारे मला भेटले मी त्यांना सांगितलं आपली राज्यात महायुती आहे महायुती धर्म पाळणे बंधनकारक आहे..त्यांची तब्येत बरी नाहीये, असे मुख्यमंत्री म्हणाले.