मुंबई : Maharashtra assembly election 2019 विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मतदानानंतर आता निकालांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. देशात आणि राज्यात भाजपाची पकड पाहता यंदा विधानसभेच्या निवडणुकांमध्येही भाजपाच्याच वाट्याला यश मिळणार असल्याचा आत्मविशावास पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील या दिग्गजांनी केलेल्या प्रचाराच्या बळावर आणि सत्तेवर असणारी पकड पाहता निकालांप्रतीची हमी भाजपामध्ये पाहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

LIVE : निवडणुकीचं महाकव्हरेज, राज्यभरात मतमोजणीला सुरुवात 


भाजपाच्या मुंबईतील कार्यालयामध्ये निकाल जाहीर होण्यापूर्वीच दिवाळी पाहायला मिळत आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दीपावलीचं औचित्य साधत आणि अर्थातच निकालांच्या निमित्ताने भाजपा कार्यालयात लक्षवेधी सजावट करण्यात आली आहे. 'महाराष्ट्राचे महाआभार ' असं मोठ्या अक्षरात लिहिलेले बॅनर लावण्याची तयारी ठेवण्यात आली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.


LIVE निकाल महाराष्ट्राचा : औरंगाबाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, अमित शाह, यांची छायाचित्र असणारे हे बॅनर मतदारांचे आभार मानण्यासाठी विविध ठिकाणी उभे करण्यात येत आहेत. एकंदरच विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारण्याचा आत्मविश्वास महायुतीच्या विशेष म्हणजे भाजपच्या गोटात पाहायला मिळत आहे.




फक्त बॅनरपुरताच मर्यादित न राहता निकालांनंतर विजयोत्सव साजरा करण्यासाठी भाजपा कार्यालयाल गोडाच्या पदार्थांचेही ढीग पाहायला मिळत आहेत. कार्यकर्ते आणि विजयी उमेदवारांचं तोंड गोड करण्यासाठी भाजपा कार्यालय सर्वतोपरी सज्ज आहे. तेव्हा आता प्रतिक्षा आहे, ती म्हणजे अंतिम आकडेवारी जाहीर होण्याची.