मुंबई : महाराष्ट्र विधानसभा २०१९ चा निकाल स्पष्ट झाला आहे. मतदारांनी महायुतीच्या बाजुने कौल दिल्याचे दिसून आले. महायुतीचे उमेदवार हे सुरुवातीपासूनच आघाडीवर पाहायला मिळाले. भाजपाने अबकी बार दोनशे पार आणि शिवसेनेने अबकी बार शंभर पार असा नारा दिला होता. पण मतदारांनी भाजपाला शंभर पर्यंत आणून सोडले तर शिवसेनेला साठीच्या घरापर्यंत नेले. त्या तुलनेत लोकसभा निवडणुकीत आत्मविश्वास गमावलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून आले. काँग्रेसने ४५ तर राष्ट्रवादी ५८ जागांपर्यंत मजल मारली. आपल्याला कोणी गृहीत धरु नये हेच या निकालातून मतदारांनी दाखवून दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत वरळीतील निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची होती. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून निवडणूक लढवली. यात त्यांना ८९ हजार २४८ मतं मिळाली. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे यांच्या रुपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरली. त्यामुळे शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांनी इथे प्रचारासाठी जोर लावला होता. मुंबईतील ३६ मतदारसंघातून या उमेदवारांना मुंबईकरांनी कौल दिला आहे. 


दुपारी ३.०३ वाजता : आदित्य ठाकरे वरळीतून विजयी, ठाकरे घराण्यातील पहीला आमदार विधानसभेत


दुपारी २.३४ वाजता : चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेचे दिलीप लांडे विजयी, काँग्रेसच्या नसीम शेख यांचा पराभव. नसीन खान हे चार वेळा आमदार राहीले आहेत.


दुपारी २.३० वाजता : शिवडी मतदार संघातून शिवसेनेचे अजय चौधरी यांचा विजय झाला आहे.


दुपारी २.३० वाजता :चारकोप विधानसभेचे भाजपा उमेदवार योगेश सागर हे विजयी झाले आहेत.


दुपारी १.५० वाजता : मागाठाणे विधानसभा शिवसेना उमेदवार प्रकाश सुर्वे विजयी 


दुपारी १.४० वाजता : दिंडोशी मतदार संघात शिवसेनेचे सुनील प्रभु विजयी 


दुपारी १.३० वाजता : जोगेश्वरी मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर विजयी झाले आहेत.


दुपारी १२.०० वाजता : तृप्ती सावंतांची बंडखोरी शिवसेनेला भोवली, महाडेश्वर १६०० मतांनी पराभूत


दुपारी १.२७ वाजता : चारकोप विधानसभेचे भाजपा उमेदवार योगेश सागर हे विजयी झाले आहेत.


दुपारी १.१७ वाजता : मागाठाणे विधानसभा शिवसेना उमेदवार प्रकाश सुर्वे विजयी 


दुपारी १.०७ वाजता : दिंडोशी मतदार संघात शिवसेनेचे सुनील प्रभु विजयी 


दुपारी १.०० वाजता : जोगेश्वरी मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर विजयी झाले आहेत. 


सकाळी ११.३७ वाजता : दादर माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर  ५८७१ मतांनी आघाडीवर
सातवी फेरी अखेर शिवसेनेची आघाडी कायम. सदा सरवणकर (शिवसेना) -  १८९१५. संदीप देशपांडे (मनसे)-  १३०४४


सकाळी ११.३६ वाजता : अणुशक्ती  विधानसभा - ११ वी फेरी नवाब मलिक 11818 मतांनी आघाडीवर
तुकाराम काते (सेना)- 29840, नवाब मलिक (राष्ट्रवादी) 41658


सकाळी ११.३२ वाजता : भायखळा विधानसभा मतदारसंघ. पाचव्या फेरीत एकूण मतदान
यामिनी जाधव - 18528(शिवसेना), मधु चव्हाण - 7939 (काँग्रेस),वारीस पठाण - 4569(एमआयएम), गीता गवळी - 3264,शिवसेनेच्या यामिनी जाधव 18528 मतांनी आघाडीवर..


सकाळी ११.३० वाजता : विक्रोळी मतदात संघ. फेरी - बारावी, शिवसेनेचे सुनील राऊत आघाडीवर
सुनील राऊत (शिवसेना) - 3934. एकूण - 42839 धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी) - 2363
एकूण - 23486.  विनोद शिंदे (मनसे) - 574 एकूण - 12372.  सिध्दार्थ मोकळे (वंचित) -  737, एकूण - 5996. नोटा - 184, एकूण - 2187. आघाडी - 19353


सकाळी ११.२७ वाजता : दादर माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर  ५८७१ मतांनी आघाडीवर. सातवी फेरी अखेर शिवसेनेची आघाडी कायम. सदा सरवणकर (शिवसेना) -  १८९१५. संदीप देशपांडे (मनसे)-  १३०४४


सकाळी ११.२४ वाजता : अणुशक्ती  विधानसभा - ११ वी फेरी नवाब मलिक 11818 मतांनी आघाडीवर
तुकाराम काते (सेना)- 29840, नवाब मलिक (राष्ट्रवादी) 41658


सकाळी ११.२० वाजता : भायखळा विधानसभा मतदारसंघ. पाचव्या फेरीत एकूण मतदान
यामिनी जाधव - 18528(शिवसेना), मधु चव्हाण - 7939 (काँग्रेस),वारीस पठाण - 4569(एमआयएम), गीता गवळी - 3264,शिवसेनेच्या यामिनी जाधव 18528 मतांनी आघाडीवर..


सकाळी ११.१८ वाजता :विक्रोळी मतदात संघ. फेरी - बारावी, शिवसेनेचे सुनील राऊत आघाडीवर
सुनील राऊत (शिवसेना) - 3934. एकूण - 42839 धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी) - 2363 एकूण - 23486.  विनोद शिंदे (मनसे) - 574 एकूण - 12372.  सिध्दार्थ मोकळे (वंचित) -  737, एकूण - 5996. नोटा - 184, एकूण - 2187. आघाडी - 19353


सकाळी ११.१६ वाजता : वर्सोवा : पाचव्या फेरीत खोसा आघाडीवर पण राजुल पटेल 412 मतांनी अजूनही पूढे. भारती लव्हेकर (भाजपा) - 1050, राजुल पटेल (अपक्ष)-1968, बलदेव खोसा - ( काँग्रेस) - 2176, संदेश देसाई (मनसे) - 125


सकाळी ११.१३ वाजता : चारकोप विधानसभा
सातवी फेरी- भाजप - योगेश सागर- 41554, कांग्रेस:-कालू बुधेलिया:- 8077


सकाळी ११.१० वाजता : भायखळा विधानसभा मतदारसंघ
चौथ्या फेरीत यामिनी जाधव - 15247 (शिवसेना), मधु चव्हाण - 6901 (काँग्रेस),वारीस पठाण - 3119 (एमआयएम), गीता गवळी - 1647 
शिवसेनेच्या यामिनी जाधव 8246 मतांनी आघाडीवर..


सकाळी ११.०९ वाजता : दिंडोशी सातवी फेरी - सुनील प्रभु- शिवसेना- 28268, विद्या चव्हाण- राष्ट्रवादी- 15118, अरुण सुर्वे- मनसे- 11185, शिवसेना- 13150 मतांनी आघाडीवर, नोटा- एकूण 990


सकाळी ११.०७ वाजता : 7 व्या फेरी अखेर  काँग्रेस-वर्षा गायकवाड- 18664, शिवसेना-आशिष मोरे- 12376 , एमआयएम- मनोज संसारे-3758


सकाळी १०.४० वाजता : चेंबूर - पाचवा राऊंड | फातरफेकर (शिवसेना)- १०७०३, चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस) - १२६६५, राजेंद्र (वंचित) - ५२८६


सकाळी १०.३५ वाजता : 176 वांद्रे पूर्व | 6 व्या फेरीअखेर अखिल चित्रे(मनसे) 4801, झिशान बाबा सिद्दीकी( काँग्रेस) 8605, विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) 13267,तृप्ती सावंत (अपक्ष) 7352,मोहमद सलिम कुरेशी (AIM)3691, नोटा मते 871


सकाळी १०.३० वाजता : सेनेचे विश्वनाथ महाडेश्वर ४६२२ मतांनी आघाडीवर


सकाळी १०.१० वाजता : मालाड पश्चिम १६२ विधानसभा मतदार संघ : चौथ्या फेरीअखेर अस्लम शेख ( काँग्रेस ) : ३९७१ तर रमेश सिंग ठाकूर ( भाजप ) : २७६२


सकाळी १०.१० वाजता : विक्रोळी विधानसभा- सातव्या फेरीनंतर सुनील राऊत (सेना)- 23677, धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी) - 15444, विनोद शिंदे ( मनसे) - 8015, सिद्धार्थ मोकळे (वंचित) - 2306, नोटा - 1196


सकाळी १०.१० वाजता : अणुशक्ती विधानसभा - राऊंड - 06 नवाब मलिक आघाडीवर तुकाराम काते (सेना)- 10662. नवाब मलिक (राष्ट्रवादी) 50093. विजय रावराणे (मनसे)108 नोटा -54


सकाळी १०.०० वाजता : मानखुर्द-शिवाजी नगरमध्ये अबू आझमी शिवसेनेच्या विठ्ठल लोकरेंपेक्षा १७,००० मतांनी पुढे


सकाळी ९.५१ वाजता : कुलाब्यात भाजपाचे राहुल नार्वेकर २,२५६ मतांनी आघाडीवर


सकाळी ९.४३ वाजता : भायखळा | पहिल्या फेरीत शिवसेनेच्या यामिनी जाधव २५५० मतांनी आघाडीवर


सकाळी ९.३६ वाजता : राजुल पटेल (अपक्ष)-२४४३, भारती लव्हेकर (भाजपा)१६२०, बलदेव खोसा(काँग्रेस)-१७४१, संदेश देसाई( मनसे)-१९०


सकाळी ९.३० वाजता : दहिसर चौथा राऊंड, मनिषा चौधरी (भाजपा)-३०.११९, अरुण सावंत (काँग्रेस)-३८९५, राजेश येरुणकर (मनसे)-४२५२, नोटा- १०१२


सकाळी ९.२० वाजता : आशिष शेलार (भाजपा)-३,९५२, आसिफ (काँग्रेस)-२,२२४, इस्तियाक (वंचित)- ५०, अरुण जाधव (बसपा)-९२


सकाळी ९.१५ वाजता : वरळी पहिली फेरी | आदित्य ठाकरे(शिवसेना)-७०२५, सुरेश माने (राष्ट्रवादी)-९१९, अभिजीत बिचकुले-८४, नोटा-६४५


सकाळी ९.१० वाजता : वांद्रे पूर्वमधून महापौर विश्वनाथ महाडेश्वर आघाडीवर


सकाळी ९.०५ वाजता :  दहिसर पहिला राऊंड | भाजपाच्या मनिषा चौधरी ४६०८ मतांनी आघाडीवर


सकाळी ९.०० वाजता : दिंडोशी सुनील प्रभू ३५०० मतांनी आघाडी


सकाळी ८.५५ वाजता : घाटकोपर (पूर्व) भाजपाचे पराग शहा २ हजार मतांनी आघाडीवर


सकाळी ८.५० वाजता : गोरेगावात भाजपाच्या विद्या ठाकूर ४५६४ मतांनी आघाडीवर


सकाळी ८.४५ वाजता : अजय चौधरी (शिवसेना)-३७२८, संतोष नलावडे (मनसे)-१९५६, उदय फणसेकर (कॉंग्रेस)-८२५


सकाळी ८.४५ वाजता : विक्रोळीतून शिवसेनेचे सुनिल राऊत आघाडीवर


सकाळी ८.४० वाजता : आदित्य ठाकरे सुमारे ६ हजार मतांनी आघाडीवर


सकाळी ८.३४ वाजता : भाजपाचे मंगलप्रभात लोढा आघाडीवर


सकाळी ८.३० वाजता : शिवसेनेचे अजय चौधरी आघाडीवर


सकाळी ८.२३ वाजता : माहिममधून सदा सरवरणकर आघाडीवर


सकाळी ८.०७ वाजता : वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे आघाडीवर


सकाळी ८.०७ वाजता : मुंबईत भाजपाला २ तर शिवसेनेला १ ठिकाणी आघाडी


सकाळी ८.०० वाजता : वरळीमध्ये मतमोजणीला सुरुवात


सकाळी ७.४५ वाजता :  कुलाब्यात मतदानाला सुरुवात


तुमच्या भागाचा निकाल पाहा एकाच क्लिकवर


LIVE निकाल महाराष्ट्राचा : मुंबई


LIVE निकाल महाराष्ट्राचा : कोकण


LIVE निकाल महाराष्ट्राचा : मराठवाडा 


LIVE निकाल महाराष्ट्राचा : विदर्भ


LIVE निकाल महाराष्ट्राचा : पश्चिम महाराष्ट्र


LIVE निकाल महाराष्ट्राचा : उत्तर महाराष्ट्र



या निकालाच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी दहा हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक उपस्थित राहतील. फेरी निहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत, असे ते म्हणालेत. मतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्राँगरूमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि राज्य पोलीस यांचा खडा पाहारा ठेवण्यात आला आहे.