कोकणात काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागलेत. बंडखोरीचा फटका हा शिवसेनेला बसला आहे. राष्ट्रवादीने आपल्या जागा राखण्याचे काम केले. तर शिवसेनेने रायगडमध्ये चांगली कामगिरी केली. भाजपनेही आपल्या जागा कायम ठेवल्या. रत्नागिरीत भाजपच्या वाट्याला काहीही आलेले नाही. येथे भाजपचा उमेदवार नव्हता. तर सिंधुदुर्गात भाजपने खाते खोलले आहे. नितेश राणेंच्या रुपात भाजपला आमदार मिळाला आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यात शिवसेनेची चांगली कामगिरी दिसून येत आहे. तर राष्ट्रवादीने रत्नागित एक आणि रायगडमध्ये एक जागा जिंकली आहे.
- सावंतवाडी - शिवसेनेचे राज्यमंत्री दीपक केसरकर हे १३ हजार ९४१ मतांनी विजयी, भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली पराभूत
- कुडाळ - शिवसेनेचे वैभव नाईक हे १४ हजार ३४९ मतांनी विजयी, भाजप पुरस्कृत उमेदवार रणजीत देसाई यांचा पराभव
- कणकवलीतून भाजपचे नितेश राणे विजयी, शिवसेनेचे सतीश सावंत पराभूत
रत्नागिरी - उदय सामंत (शिवसेना) - सुदेश मयेकर (राष्ट्रवादी)
चिपळूण - शेखर निकम (राष्ट्रवादी) - पराभूत सदानंद चव्हाण (शिवसेना)
गुहागर - भास्कर जाधव (शिवसेना) - पराभूत राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर
राजापूर - राजन साळवी (शिवसेना)- पराभूत अविनाश लाड (काँग्रेस)
खेड-दापोली - योगश कदम (शिवसेना) - पराभूत संजय कदम (राष्ट्रवादी)
- महाड - भरत गोगावले (शिवसेना ) 102273 विजयी तर माणिक जगताप ( काँग्रेस) पराभूत 80698
- पनवेल - प्रशांत ठाकूर (भाजप) 179109 विजयी , शेकापचे हरेश केणी - 168 86379
-अलिबाग - महेंद्र दळवी (शिवसेना) 108081 विजयी , सुभाष पंडित पाटील (शेकाप) 74550
- श्रीवर्धन - अदिती सुनील तटकरे (राष्ट्रवादी) 92074 विजयी , विनोद घोसाळकर (शिवसेना) 52453
- पेण - रवीशेठ पाटील (भाजप) 112380विजयी , धैर्यशील मोहन पाटील (शेकाप) 88329
- उरण - महेश बल्दी (अपक्ष) 74549 विजयी, भाजप बंडखोर , मनोहर भोईर (शिवसेना) 68839
कोकणात काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागलेत. बंडखोरीचा फटका हा शिवसेनेला बसला आहे. रत्नागिरी आणि रायगडमध्ये राष्ट्रवादीने यश मिळवले आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपने सिंधुदुर्गात नितेश राणे आणि रत्नागिरीत चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे शेखर निकम आणि श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांनी मोठा विजय मिळवला आहे. निकम आणि तटकरे या प्रथमच आमदार होत आहे. तर खेड-दापोलीमध्ये राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का बसला आहे. या ठिकाणी शिवसेनेचे योगशे कदम हे सुरुवातीपासून आघाडीवर होते. त्यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम यांना जोरदार दे धक्का दिला आहे. अन्य ठिकाणी शिवसेनेने चांगली कामगिरी केली आहे.
दुपारी १.२० वाजता : रायगडमध्ये उरणमध्ये भाजप बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार महेश बालदी विजयी, शिवसेनेचे मनोहर भोईर यांना पराभूत केले. ५७१८ मतांनी महेश बालदी विजयी झालेत.
उरण विधानसभा मतदार संघ अंतिम मतमोजणी २४ वी फेरी
मनोहर भोईर (शिवसेना) - 68,745
विवेक पाटील (शेकाप) - 61,456
महेश बालदी (अपक्ष ) - 74,463
दुपारी १.०० वाजता : सिंधुदुर्ग- कुडाळ-मालवण मधून वैभव नाईक विजयी. कुडाळ- मालवण मधून वैभव नाईक यांनी घेतले १४२१८ चे मताधिक्य.
वैभव नाईक (शिवसेना) -68647
रणजित देसाई (अपक्ष) -54423
शिवसैनिकांचा एकच जल्लोष.
दुपारी १२.४५ वाजता :
सावंतवाडी- सोळावी फेरी
दीपक केसरकर यांना 53,714
राजन तेली 40,667
दीपक केसरकर यांना 13,047
दुपारी १२.३३ वाजता :
सिंधुदुर्ग - कुडाळमधून वैभव नाईक यांची विजयाच्या दिशेन वाटचाल.
सतराव्या फेरीत नाईक यांनी आघाडी घेतली आहे.
वैभव नाईक (57,024 मते)
रणजित देसाई (46,105 मते)
वैभव नाईक 10,919मतांनी आघाडीवर
दुपारी १२.३० वाजता : रत्नागिरीतील गुहागर विधानसभा - नववी फेरी
भास्कर जाधव 8693 मतांनी आघाडीवर
भास्कर जाधव - शिवसेना - 30956
सहदेव बेटकर - राष्ट्रवादी - 22262
दुपारी १२.२९ वाजता :अलिबाग विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे महेंद्र दळवी 23 फेरी अखेर आघाडीवर. महेंद्र दळवी 28 हजार 933 मतांनी आघाडीवर. शेकापचे पंडित पाटील पिछाडीवर
दुपारी १२.०१ वाजता : सिंधुदुर्ग - कणकवली मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार नितेश राणे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
दुपारी १२.०१ वाजता : सिंधुदुर्ग - कुडाळमध्ये १५ व्या फेरीत शिवसेनेची आघाडी
वैभव नाईक ( 50,039 मते)
रणजित देसाई (40,005 मते)
वैभव नाईक 10,034 मतांनी आघाडीवर
दुपारी १२.०० वाजता : उरण विधानसभा मतदार संघ अपडेट, फेरी 16 वी
मनोहर भोईर (शिवसेना) - 46,234
विवेक पाटील (शेकाप) - 44,821
महेश बालदी (अपक्ष ) - 51,084
दहाव्या फेरी अंती 4850 मतांनी महेश बालदी आघाडीवर
सकाळी ११. ५९वाजता : रत्नागिरी विधानसभा (१६) फेरी अखेर मते
उदय सामंत - ७३५७५
सुदेश मयेकर - २०२६७
उदय सामंत ५३३०८ मतांनी आघाडीवर
सकाळी ११.५९वाजता : नितेश राणे 18432 मतांनी आघाडीवर 13 व्या फेरीपर्यंत
सकाळी ११.५२ वाजता : रायगडमधून श्रीवर्धन मतदार संघातून चौदाव्या फेरीअखेर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे २३ हजार ४२० ने आघाडीवर, सेनेचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
सकाळी ११.४८ वाजता : रायगड जिल्ह्यात युतीला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. भाजपा - पेण, पनवेल भाजप तर उरणचे अपक्ष ( भाजपा बंडखोर ) आघाडीवर.
सकाळी ११.४० वाजता : रत्नागिरी - राजापूर विधानसभा (सातवी फेरी)
राजन साळवी (शिवसेना ) - 15147
अविनाश लाड (काँग्रेस) - 18063
अविनाश लाड 2616 मतांनी आघाडीवर
सकाळी ११.३६ वाजता : पनवेल विधानसभा मतदारसंघअकरावी फेरी
प्रशांत ठाकूर (भाजप) एकूण मते 83374
हरेश केणी ( शेकाप ) एकूण मते 47126
नोटा - 6216, 36,248 मतांनी प्रशांत ठाकूर आघाडीवर
सकाळी ११. ३४ वाजता : भरत मारुती गोगावले(शिवसेना) 53884(आघाडी)
माणिक मोतीराम जगताप(काँग्रेस) 46589(पिछाडी)
भरत गोगावले(शिवसेना) 7 हजार 295मतांनी आघाडीवर
सकाळी ११.१८ वाजता : चिपळूण मतदारसंघ १९ व्या फेरीत राष्ट्रवादीचे शेखर निकम आघाडीवर
सदानंद चव्हाण 2790, शेखर निकम 2879, सचिन मोहिते 97
नोटा 85, एकूण चव्हाण 59350, निकम 81255, मोहिते 1910, नोटा 1781
सकाळी ११.१३ वाजता : पेणमध्ये आठव्या फेरीत रवीशेठ पाटील (भाजप) - 5580, धैर्यशील पाटील (शेकाप) - 2691, नंदा म्हात्रे (काँग्रेस) - 155, रामशेठ घरत (अपक्ष) - 19, नोटा - 172, आठवा फेरी अखेर रवीशेठ पाटील 13341 मतांनी आघाडीवर
सकाळी ११.०८ वाजता :कणकवलीत सहावी फेरीपर्यंत निकाल नितेश राणे भाजप 21574, सतीश सावंत शिवसेना 12635, नितेश राणे 8939 मतांनी आघाडीवर
सकाळी ११.०७ वाजता : उरण विधानसभा मतदारसंघात दहाव्या फेरीत बंडखोर महेश बालदी 3400 मतांनी आघाडीवर, दुसऱ्या क्रमांकावर शेकाप चे विवेक पाटील आहेत
सकाळी ११.०५ वाजता : महाड विधानसभा तेराव्या फेरीत भरत मारुती गोगावले (शिवसेना) ४६९६३ (आघाडी), माणिक मोतीराम जगताप(काँग्रेस)३६९४२ (पिछाडी), भरत गोगावले(शिवसेना) १० हजार २१ मतांनी आघाडीवर
सकाळी ११.०२वाजता : सिंधुदुर्गातील सावंतवाडीत आठव्या फेरीत शिवसेनेचे दीपक केसरकर यांना ४ हजार ८४१ मतांची आघाडी भाजपचे राजन तेली पिछाडीवर.
सकाळी ११.०० वाजता : रत्नागिरी गुहागर विधानसभा चौथ्या फेरीअखेर शिवसेनेचे भास्कर जाधव यांची राष्ट्रवादीच्या सहदेव बेटकर यांच्यावर 1911 मतांची आघाडी
१. (बसपा ) उमेश पवार - 56
२. (मनसे) गणेश कदम - 107
३.(राष्ट्रवादी ) सहदेव बेटकर - 1817
४. (शिवसेना) भास्कर जाधव - 2442
५.(वंचित) विकास जाधव - 258
६.(नोटा) - 65
सकाळी १०.४८ वाजता : श्रीवर्धन मतदार संघातून नवव्या फेरीअखेर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे 16 हजार 277 ने आघाडीवर, शिवसेने सेनेचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
सकाळी १०.४४ वाजता : रत्नागिरी - दापोली विधानसभा (सातवी फेरी) योगेश कदम (शिवसेना) - 24606, संजय कदम (राष्ट्रवादी) - 19520, योगेश कदम 5086 ने आघाडीवर
सकाळी १०.४० वाजता : सिंधुदुर्ग - कणकवली नववी फेरीत नितेश राणे 13905 मतांनी आघाडीवर
सकाळी १०. ३९ वाजता : रायगडधीली पेणमधून सहावा राउंड अखेर भाजपचे रवींद्र पाटील 7 हजार 639 मतांनी आघाडीवर
सकाळी १०.३८ वाजता : रत्नागिरी - रत्नागिरी विधानसभा (नववी फेरी) उदय सामंत (शिवसेना) - 42754, सुदेश मयेकर (राष्ट्रवादी) - 7345, उदय सामंत 35405 मतांनी आघाडीवर
सकाळी १०.२८ वाजता : रत्नागिरी - रत्नागिरी विधानसभा (सातवी फेरी) उदय सामंत (शिवसेना) - 37538,सुदेश मयेकर (राष्ट्रवादी) - 6488, उदय सामंत 31080 मतांनी आघाडीवर
सकाळी १०.२६ वाजता : रायगडमधील उरण विधानसभा मतदार संघात युतीचे उमेदवार मनोहर भोईर - 4673 -एकूण मते 21284, आघाडीचे उमेदवार विवेक पाटील - 1889- एकूण मते 21,058 अपक्ष उमेदवार महेश बालदी - 2915- एकूण मते 22,277 सातव्या फेरी अंती 993 मतांनी अपक्ष उमेदवार महेश बालदी आघाडीवर
सकाळी १०.२५ वाजता : रत्नागिरी - राजापूर विधानसभा (चौथी फेरी), राजन साळवी (शिवसेना ) - 10492,अविनाश लाड (काँग्रेस) - 11742, अविनाश लाड 1250 मतांनी आघाडीवर
सकाळी १०.२४ वाजता : श्रीवर्धन मतदार संघातून सातव्या फेरीअखेर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे 11 हजार 443 ने आघाडीवर, सेनेचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
सकाळी १०.२४ वाजता : रत्नागिरी - दापोली विधानसभा मतदासंघात (चौथी फेरी) योगेश कदम (शिवसेना) - 13938 आघाडीवर तर संजय कदम (राष्ट्रवादी) - 11506 मते. योगेश कदम 2432 मतांनी आघाडीवर
सकाळी १०.२१ वाजता : सिंधुदुर्गातून सावंतवाडीत पाचवी फेरीत दीपक केसरकर यांना 2,882 मतांची आघाडी घेतली.
सकाळी १०.२० वाजता :पनवेलमध्ये सातव्या फेरीत भाजपचे प्रशांत ठाकूर 22,214 मतांनी आघाडीवर.
सकाळी १०.२० वाजता :रायगडमधून अलिबागमध्ये दहाव्या फेरीअखेर शिवसेनेचे महेंद्र दळवी 13 हजार 519 मतांनी आघाडीवर
सकाळी १०.१३ वाजता : कणकवलीतून नितेश राणे आघाडीवर, भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु
सकाळी १०.०५ वाजता : चिपळूण विधानसभा मतदासंघात दहावी फेरीत राष्ट्रवादीचे शेखर निकम 16683 मतांनी आघाडीवर, शिवसेना -सदानंद चव्हाण 32952, राष्ट्रवादी -शेखर निकम -49635 मते
सकाळी १०.०४ वाजता : रायगड - श्रीवर्धन मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडी आदिती तटकरे ५ व्या फेरीअखेर ८ हजार ८८० आघाडीवर, विनोद घोसाळकर पिछाडीवर
सकाळी १०.०२ वाजता : रत्नागिरीतील गुहागर विधानसभा निकाल - तिसरी फेरीत भास्कर जाधव आघाडीवर, भास्कर जाधव - शिवसेना - १००५५, सहदेव बेटकर - राष्ट्रवादी - ८७६९, भास्कर जाधव १२८६ मतांनी आघाडीवर
सकाळी ९. ५८ वाजता : रत्नागिरीतील गुहागरमधून शिवसेनेचे भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सहदेव बेटकर यांच्यात जोरदार चुरस केवळ ७४ मतांनी जाधव आघाडीवर
सकाळी ९. ५५ वाजता : रत्नागिरी विधानसभा (पाचवी फेरी) उदय सामंत (शिवसेना) - 22838, सुदेश मयेकर (राष्ट्रवादी) - 3595, उदय सामंत 19240 मतांनी आघाडीवर
सकाळी ९. ५२ वाजता : राजापुरात दुसरी फेरीत राजन साळवी ( शिवसेना ) - 5929, अविनाश लाड ( काँग्रेस ) - 6105, अविनाश सौंदलकर ( मनसे ) - 228, महेंद्र पवार - 146, विलास खानविलकर - 191, राज पाध्ये - 51 संदीप ठुकरुल - 52 नोटा - 280, अविनाश लाड 176 ने आघाडी राजन साळवी पिछाडीवर
सकाळी ९. ४९ वाजता : रत्नागिरी -चिपळुणात नवव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे शेखर निकम 13350 मतांनी आघाडीवर, शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांना मोठा धक्का
सकाळी ९. ४५ वाजता : रत्नागिरीतील खेड-दापोली मतदारसंघातून शिवसेनेचे योगेश कदम १०१३ मतांनी आघाडीवर तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम पिछाडीवर
सकाळी ९. ३२ वाजता : पनवेल मतदार संघात दुसऱ्या फेरीत प्रशांत ठाकूर आघाडी वर तर अलिबागमधून विधानसभा सातव्या फेरी अखेर 8 हजार 609 मतांनी शिवसेनेचे महेंद्र दळवी आघाडीवर, शेकापचे पंडित पाटील पिछाडीवर.
सकाळी ९. २० वाजता : रायगड - पेणमधून भाजपचे रवींद्र पाटील आघाडीवर, पहिल्या फेरीअखेर 498 मतांची आघाडी तर श्रीवर्धन मधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आघाडीवर 5 हजार 706 मतांनी आघाडीवर तीसरी फेरी तर शिवसेनेचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
सकाळी ९. १५ वाजता : कुडाळमधून दुसऱ्या फेरीत वैभव नाईक (शिवसेना) -6485, रणजित देसाई (अपक्ष) -4651,,अरविंद मोंडकर (काँग्रेस) -265,धीरज परब (मनसे) - 158,रवींद्र कसालकर (बसपा) -44, बाळकृष्ण जाधव (अपक्ष) -323,सिद्धेश पाटकर (अपक्ष) -62,नोटा- 128
सकाळी ९. १४ वाजता : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ दुसऱ्या फेरीनंतर उदय सामंत 7000 मतानी आघाडीवर
सकाळी ९.१२ वाजता : श्रीवर्धन मतदार संघातून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे तिसऱ्या फेरी अखेर 1 हजार 77 ने आघाडीवर
सकाळी ९.११ वाजता : रायगडमधील अलिबागमधून शिवसेनेचे महेंद्र दळवी आघाडीवर असून त्यांना ६ हजार ४३२ मते
सकाळी ९.१० वाजता : रायगडमधील पनवेलमधून भाजपचे प्रशांत ठाकूर ७८२९ मतांनी आघाडीवर, हरेश केणी यांना ६९७८ मते
सकाळी ८.५० वाजता : रत्नागिरीतील चिपळूणमधून राष्ट्रवादीचे शेखर निकम आघाडीवर शिवसेनेचे सदानंद चव्हाण पिछाडीवर तर राजापूरमधून शिवसेनेचे राजन साळवी ४२७ मतांनी आघाडीवर
सकाळी ८.५० वाजता : रत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामत आघाडीवर मोठ्या मतांनी आघाडीवर राष्ट्रवादीचे सुदेश मयेकर पिछाडीवर
सकाळी ८.४८ वाजता : कणकवलीतून नितेश राणे ५२८३ मतांनी आघाडीवर
सकाळी ८.४६ वाजता : कणकवलीतून नितेश राणे आघाडीवर तर शिवसेनेचे सतीश सावंत पिछाडीवर
सकाळी ८.४५ वाजता : रायगडमधील महाडमधून शिवसेनेचे भरत गोगावले दुसऱ्या फेरीत ५२७ मतांनी आघाडीवर
सकाळी ८.३७ वाजता : कणकवलीतून नितेश राणे दुसऱ्या फेरीत २५५३ मतांनी आघाडीवर
सकाळी ८.३७ वाजता : रायगडमधील श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आघाडीवर, शिवसेनेचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
सकाळी ८.३५ वाजता : रायगडमधील अलिबागमधून शिवसेनेचे महेंद्र दळवी हे २ हजार ३१३ मतांनी आघाडीवर, शेकापचे पंडीत पाटील पिछाडीवर आहेत
सकाळी ८.३५ वाजता : सिंधुदुर्गातून शिवसेनेचे वैभव नाईक, दीपक केसरकर आघाडीवर
सकाळी ८.३१ वाजता : रत्नागिरीतून शिवसेनेचे उदय सामत आघाडीवर
सकाळी ८. ३१ वाजता : सिंधुदुर्गातील कणकवली पहिल्या फेरीत नितेश राणे याना२९६५ तर सतीश सावंत यांना २२५२ मतदान राणे ७१३ मतांनी आघाडीवर
सकाळी ८. ३०वाजता : रायगड - सातही विधानसभा मतदार संघात मतमोजणीला सुरुवात. अलिबाग , पेण , उरण , महाड , कर्जत , श्रीवर्धन , पनवेल मतदार संघात मतमोजणीला प्रारंभ. टपाली मते मोजण्यास सुरुवात
सकाळी ८.२३ वाजता : कणकवलीतून पहिल्या फेरीत नितेश राणे ७१३ मतांनी आघाडीवर
सकाळी ८.१२ वाजता : रत्नागिरी, राजापूर, दापोली, चिपळूण आणि गुहागरमध्ये मतमोजणीला सुरुवात
सकाळी ८.०९ वाजता :सिंधुदुर्ग- कणकवली मतमोजणी केंद्रावर शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत दाखल, मतमोजणी सुरू होण्यापूर्वी सतीश सावंत दाखल, पोस्टल मतदानाला सुरवात
सकाळी ८.०६ वाजता : कणकवलीत मतमोजणीला सुरुवात, ६७६ टपाली मतमोजणीला सुरुवात
सकाळी ७.४५ वाजता : थोड्यात वेळात मतमोजणीला सुरुवात होणार, आधी पोस्टल मतदान
रत्नागिरी/ सिंधुदुर्ग/रायगड : कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात १६ मतदारसंघाची आज मतमोजणी होत आहे. याठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व दिसून येत आहे. मात्र, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात विरोधक मुसंडी मारणार का, याची चर्चा आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांच्यात काही ठिकाणी लढत दिसत आहे. त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे. सिंधुदुर्गात प्रामुख्याने राज्यात युती असताना शिवसेना विरोधात भाजप अशी लढत पाहायला मिळत आहे. येथे शिवसेनेबरोबर नारायण राणे यांची खरी कसोटी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दोन ठिकाणी राष्ट्रवादी आपल्या जागा कायम राखणार की शिवसेना येथे बाजी मारणार याचीही उत्सुकता आहे. तर रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शेकापला आव्हान असणार आहे ते शिवसेना आणि भाजपचे. त्यामुळे या ठिकाणी लक्ष लागले आहे. दरम्यान, निवडणूक निकालादरम्यान, प्रत्येक जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आणि तरुणांना आवाहन केले आहे, कोणीही शांतता भंग करु नये.
आज सकाळी ८ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरु होणार असून निवडणूक निकालानंतर काही अतिउत्साही तरुण मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून विरोधकांच्या घरासमोरून फिरवणे तसेच विरोधकांच्या दरवाजामध्ये फटाके वाजवणे, गुलाल उधळणे,अर्वाच्य घोषणा देणे असे कृत्य करून आपापसात तेढ वाढवतात. त्यामुळे वाद होऊन मारामारी सारखे गंभीर गुन्हे घडतात व त्याचे दुष्परिणाम नागरिकांना आणि नातेवाईकांना भोगावे लागतात. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कोणलाही विजयी रॅलीला परवाणगी देण्यात येणार नाही. आगामी दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये गुन्हा दाखल झालेनंतर तुरुंगात/जेलमध्ये जाऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर खासगी किंवा सरकारी कसलीही नोकरी मिळणार नाही. भविष्य काळ खूप अंधारात जाईल, याची जाणीव असावी, असे कडक आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.