मुंबई : राज्यासह मुंबईतही कोरोनासह (Corona Variant Omicron)  ओमायक्रॉनचा जोर वाढतोय. दररोज वाढणाऱ्या या आकड्यामुळे सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) होईल का, अशी दबक्या आवाजात सर्वसामांन्यामध्ये चर्चा आहे. या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लावणार की नाही, याबाबत कॅबिनेट मंत्री,  मुंबई शहराचे पालकमंत्री (Mumbai Guardian Minister) आणि मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख (Aslam Sheikh) यांनी माहिती दिली आहे. (Maharashtra Cabinet minister Aslam Sheikh Reaction over to lockdown Corona Omicron) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनबाबत काय म्हणाले अस्लम शेख? 


"राज्यात आणि मुंबईत आम्हाला पुन्हा लॉकडाऊन बघायचा नाही. लॉकडाऊन लोकांवर लादायचा नाही. आम्ही दर दोन चार दिवसांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतोय. कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध कडक करतोय. आधी ज्या समारंभांना मोठ्या प्रमाणात परवानगी दिली होती, तिथेही निर्बंध घातले आहेत, कारण आपल्याला रुग्णसंख्या वाढवायची नाही. तसेच रुग्णसंख्ये नियंत्रणात ठेवायची असेल तर, लोकांचीही मदत लागेल, असं अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं.   



दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि मुंबईत कोरोनाचा विस्फोट होताना दिसतोय. तर ओमायक्रॉनचा आकडाही दिवसेंदिवस वाढतोय. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करावं, असं आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. 


दिवसभरात राज्यात किती रुग्ण? 


राज्यात आज 2 हजार 172 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर 22 जणांची कोरोना विरुद्धची झुंज अपयशी ठरली आहे. दिलासादायक बाब अशी की आज राज्यात एकाही ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झालेली नाही.