मुंबई : राज्य सरकारने जिम आणि ब्युटी पार्लर व्यवसायिकांना (Gym and Beauty Parlours Guideline) मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने (Maharashtra State Government) जिम आणि ब्युटी पार्लरसाठी असलेले निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांसाठी काहीसा धीर नक्कीच मिळाला आहे. राज्य सरकारने कोरोना निर्बंधाचे सुधारित आदेश जारी केले आहेत. यामध्ये हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र यासह काही अटीही घालण्यात आल्या आहेत. (maharashtra corona new guidleline state government give permission to operate gym and beauty parlor with 50 percent capicity) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सुधारित आदेशांनुसार, जिम आणि ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र ब्यूटी सलूनमध्ये मास्क काढून कराव्या लागणाऱ्या एक्टिव्हिटी करता येणार नाहीत. म्हणजेच उदाहरण म्हणून तुम्हाला दाढी करायची असेल, तर तुम्हाला ती करता येणार नाही. कारण दाढी करण्यासाठी मास्क काढावा लागतो.  



व्यावसायिकांच्या विरोधानंतर सरकारचं एक पाऊल मागे 


महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य सरकारने 8 जानेवारीला नवी कोरोना नियमावली जाहीर केली. या नियमावलीनुसार जिम पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. सरकारच्या या निर्णयामुळे व्यावसायिकांनी विरोध दर्शवला. या विरोधानंतर राज्य सरकारने या व्यावसायिकांना निर्बंध शिथिल करत काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला.


मध्यरात्रीपासून निर्बंध लागू


दरम्यान राज्यात आज मध्यरात्रीपासून नव्या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार रात्री संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी असणार आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतूकीने प्रवास करता येईल. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या व्यक्तीचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण असणं बंधनकारक असणार आहेत.