मुंबई : १५ जण आमच्या संपर्कात असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकींच्या मतदानाचे कल समोर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कमिटीने पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. याच्या काही वेळापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आता फक्त ५०-५० चा फॉर्मुला यावर ठाम असल्याचे म्हटले. आम्हाला समजून घ्या असे चंद्रकांत पाटलांनी म्हटले त्यानुसार आम्ही केले. पण मला माझा पक्ष चालवायचाय त्यामुळे आता समजून घेणे नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ जण आमच्या संपर्कात असल्याचे भाजपाच्या पत्रकार परिषदेत सांगितले. 


निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन निकाल आमच्यासाठी धक्कादायक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले. साताऱ्यात उदयनराजे यांचा निकाल आणि परळी येथील पंकाजा मुंडे यांच्या  निकालाचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी रावेर येथील रोहीणी खडसे यांच्या पराभवाचा उल्लेख मात्र त्यांनी टाळला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 



मोठ्या प्रमाणात बंडखोरी दोन्ही पक्षांमध्ये झाली. याचा फटका आम्हाला बसला हे आम्हाला मान्य करावे लागेल. त्यातील काही लोक आमचीच आहेत. ती परत येतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 


तुमच्या भागाचा निकाल पाहा एकाच क्लिकवर


LIVE निकाल महाराष्ट्राचा : मुंबई


LIVE निकाल महाराष्ट्राचा : कोकण


LIVE निकाल महाराष्ट्राचा : मराठवाडा 


LIVE निकाल महाराष्ट्राचा : विदर्भ


LIVE निकाल महाराष्ट्राचा : पश्चिम महाराष्ट्र


LIVE निकाल महाराष्ट्राचा : उत्तर महाराष्ट्र