मुंबई : Nawab Malik Security : महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. (Maharashtra government has upgraded the security detail of minister Nawab Malik) मंत्री मलिक यांना धमकीचे फोन येत असल्याने राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान,  काही दिवसांपासून  मंत्री नवाब मलिक यांनी ‘एनसीबी’च्‍या (NCB) कार्यपद्‍धतीवर सवाल उपस्‍थित करत आहेत. त्यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्‍यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला धमकीचे फोन येत आहेत. माझ्या जिवाला धोका असल्याचेही अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. माझ्या सुरक्षेत वाढ करून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. (Nawab Malik will be given Y+ security) कायदा सर्वांना समान आहे. माझ्या जावयाला 8 महिने अटक करण्यात आली. माझ्या मुलीवर याचा गंभीर परिणाम झाला आहे.  ती कुठेही वावरताना दिसत नाही. तसेच भाजपकडून बिनबुडाचे आरोप होत असल्याचा दावा यावेळी मंत्री मलिक यांनी यावेळी केला.


दरम्यान, नवाब मलिक यांचे जावई समीर खान एनसीबी (NCB)विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. एनसीबीने समीर खान यांना ड्रग प्रकरणी अटक केली. त्यांना नुकताच सत्र न्यायालयाने जामीन दिला आहे. मी समीर खान प्रकरणात न्यायालयाने एनसीबीच्या तपासावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.  समीर हा ड्रग्सची तस्करी करत असल्याचे कलम लागू होत नसल्याचे न्यायालयाने जामीन देताना आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे, अशी माहिती मंत्री मलिक यांनी दिली.