मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा भूंकप (Maharashtra Political Crisis) आला आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्य सरकार अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार वाचवण्यासाठी आता शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मातोश्रीवर दाखल झाले आहेत. या बैठकीत पुढची रणनिती ठरवण्यात येणार आहे. (maharashtra political crisis sharad pawar and ajit pawar on matoshree for meeting with cm uddhav thackeray)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद आणि अजित पवार यांच्याशिवाय जयंत पाटील ही या बैठकीला उपस्थित आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गोटात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक आमदार सामील झालेत. या बंड पुकारलेल्या बंडखोरांविरोधात काय कारवाई करायची, याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचंच नाही, तर देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 


मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांची एकच गर्दी 


दरम्यान बैठकीची माहिती मिळताच शिवसैनिकांनी मातोश्री या शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवासस्थानाबाहेर एकच गर्दी केली आहे. 'शिवसेना झिंदाबाद' अशा घोषणा कार्यकर्ते देत आहेत. तसेच जे आमदारांनी बंडखोरी केलीय, त्यांच्याविरोधात निष्ठावंत शिवसैनिक फार आक्रमक झालेत. या आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.