मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून (Maharashtra Political Crisis) सत्तानाट्य सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीसमोर सरकार टिकवण्याचं आव्हान आहे. या सर्व परिस्थितीत राज्याच्या राजकीय वर्तुळातून आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे हे आजच (28 जून) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. (maharashtra political crisis uddhav thackeray may today step down on chief minister post)


राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी अडीच वाजता बैठक होणार होती. मात्र बैठकीच्या वेळेस बदल झाल्याने मंत्रिमंडळ बैठकीला पाच वाजता पुर्ननियोजित करण्यात आली. या सर्व सत्तानाट्यात महाविकास आघाडीची शेवटची मंत्रिमंडळ बैठक असणार असल्याचंही म्हटलं जातंय. त्यामुळे मुख्यमंत्री आजच राजीनामा देणार का याचीच चर्चा आता राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर रंगू लागली आहे.