NEET घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत; काय आहे NEET घोटाळ्याचा 'लातूर पॅटर्न'?
NEET परीक्षेतल्या घोटाळ्यावरून देशभरात रणकंदन सुरू आहे. आता NEET घोटाळ्याचं लातूर कनेक्शन उघड झालंय. याप्रकरणी लातूरमधून २ शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलंय. घोटाळ्याचा हा लातूर पॅटर्न नेमका काय आहे? पाहुयात,
NEET UG 2024 scam: देशभरात चर्चेत असलेल्या नीट घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन आता उघड झालंय. NEET पेपरफुटीचे धागेदोरे थेट लातूरपर्यंत पोहोचलेत. नांदेड ATS पथकानं लातूरच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेतलंय. नीट घोटाळ्यावरून देशभरात रणकंदन सुरू असताना त्याचे धागेदोरे महाराष्ट्रात पोहोचल्यानं खळबळ उडालीय. नीट घोटाळ्यात जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी केलीय.