कबूल है! सोनाक्षी-इक्बालच्या लग्नाचा पहिला फोटो समोर

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल या दोघांनीही नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. सोनाक्षी आणि झहीर 2020 पासून डेटिंग करत असल्याची माहिती आहे. 

| Jun 23, 2024, 21:29 PM IST

Sonakshi Sinha weds Zaheer Iqbal: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल या दोघांनीही नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. सोनाक्षी आणि झहीर 2020 पासून डेटिंग करत असल्याची माहिती आहे. 

1/8

कबूल है! सोनाक्षी-इक्बालच्या लग्नाचा पहिला फोटो समोर

Sonakshi Sinha weds Zaheer Iqbal First Photo Entertainment Marathi News

Sonakshi Sinha weds Zaheer Iqbal:बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत असून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल  यांच्या लग्नाची चर्चा होती. आंतरधर्मीय विवाह असल्याने सोनाक्षी सिन्हा लग्नानंतर धर्मांतर  करत इस्लाम  धर्म स्विकारणार का? अशी चर्चा होती. 

2/8

2020 पासून डेटिंग

Sonakshi Sinha weds Zaheer Iqbal First Photo Entertainment Marathi News

अखेर दोघांनीही नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. सोनाक्षी आणि झहीर 2020 पासून डेटिंग करत असल्याची माहिती आहे.

3/8

डबल XL चित्रपटात एकत्र काम

Sonakshi Sinha weds Zaheer Iqbal First Photo Entertainment Marathi News

त्यांनी 2022 मध्ये आलेल्या डबल XL चित्रपटात एकत्र काम केलं होतं. गेल्या वर्षी ही जोडी ब्लॉकबस्टर या म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली होती.

4/8

धर्माची काही भूमिका नसेल

Sonakshi Sinha weds Zaheer Iqbal First Photo Entertainment Marathi News

लग्नात ना हिंदू पद्धती असतील ना मुस्लीम. हे फक्त एक साधं लग्न असेल, असे झहीर इक्बालचे वडील इक्बाल रत्नासी यांनी म्हटले होते.हे फक्त मनांचं मिलन असून यामध्ये धर्माची काही भूमिका नसेल, असे त्यांनी सांगितले. 

5/8

माणुसकीवर विश्वास

Sonakshi Sinha weds Zaheer Iqbal First Photo Entertainment Marathi News

मी माणुसकीवर विश्वास ठेवतो. देवाला हिंदू भगवान आणि मुस्लीम अल्लाह म्हणतात. पण दिवसाच्या शेवटी आपण सर्वजण माणसं आहोत. झहीर आणि सोनाक्षी यांच्यासोबत आमच्या शुभेच्छा असल्याचे सोनाक्षीचे सासरे म्हणाले.

6/8

निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार

Sonakshi Sinha weds Zaheer Iqbal First Photo Entertainment Marathi News

'आमच्या मुलीच्या निर्णयावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ती कधीही असंवैधानिक किंवा बेकायदेशीर निर्णय घेणार नाही. ती अडल्ट असून तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. 

7/8

मिरवणुकीमध्ये नाचायला आवडेल

Sonakshi Sinha weds Zaheer Iqbal First Photo Entertainment Marathi News

मला खात्री आहे की, मला हे आवडेल. माझ्या मुलीचं लग्न झाल्यावर मला लग्नाच्या मिरवणुकीमध्ये नाचायला आवडेल, असेही ते म्हणाले होते. 

8/8

पालकांची संमती

Sonakshi Sinha weds Zaheer Iqbal First Photo Entertainment Marathi News

'माझ्या जवळचे लोक मला विचारत आहेत की मला याची माहिती का नाही, आणि मीडियाला याची माहिती आहे. आजची मुलं त्यांच्या पालकांची संमती घेत नाहीत, असे ते म्हणाले.