Politics News : शरद पवार गटाला आणखी एक धक्का! 10 आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस
Politics News : राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींना वेग आला असून, शरद पवार यांनी पाया रचलेल्या राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हं अजित पवार गटाकडे गेल्यानंतर आता या गटाला आणखी एक धक्का बसला आहे.
Sharad Pawar News : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटापुढच्या अडचणी आता आणखी वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह शरद पवार गटाच्या आमदारांना हायकोर्टानं नोटीस जारी केली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हायकोर्टात गेला आहे. ज्यामुळं आता शरद पवार गटाच्या 10 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर मागणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं आमदारांना ही नोटीस बजावली. याप्रकरणी 14 मार्चपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली असून अजित पवार गटाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे.
हेसुद्धा वाचा : मुंबईकरांच्या हक्काच्या घराबाबत फडणवीसांचं आश्वासक वक्तव्य; तुम्हालाही फायदा होण्याची दाट शक्यता