Maharashtra Political News : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result) निकाल आज जाहीर होत. मतमोजणीला सुरुवात झाली असून थोड्याच वेळात निकाल हाती येईल. पण सर्वांचंच लक्ष असेल ते ठाकरे गटाच्या उमेदवार (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या निकालाकडे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे गटाची ही पहिलीच निवडणूक. त्यामुळे ठाकरेंसाठी हा पहिलाच निकाल असेल. मात्र, पहिला फेरीपासून आघाडी घेतलेल्या ऋतुजा लटके यांचा सामना हा 'नोटा'शी असल्याचे दिसून येत आहे. अपक्ष उमेदवारांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान, भाजपनं माघार घेतल्यानं ऋतुजा लटकेंसमोर मोठं आव्हान नव्हतं. त्यांच्यासमोर इतर 6 अपक्ष उमेदवार उभे होते. त्यामुळे ऋतुजा लटकेंना किती मतं पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


Andheri Bypoll Result Live Updates : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल, पाहा कोणाला किती मतं ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने NOTA म्हणजेच 'None of the above' पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यासंदर्भात, काही महत्त्वपूर्ण आकडेवारी Association for Democratic Reforms म्हणजेच ADR ने समोर आणली आहे. मागच्या 5 वर्षात नोटाला एकूण 1 कोटी 29 लाख मतं पडलीयेत. तर, देशभरातील विधानसभा निवडणुकांमध्ये नोटाला 64 लाख 53 हजार 652 मतं म्हणजेच 1.06 टक्के मतं मिळालीयेत. तर, 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात नोटाला सर्वात जास्त म्हणजे 7लाख 42 हजार 134 मतं मिळाली होती. तर, सर्वात कमी मतं 2018 च्या मिझोराम निवडणुकीत मिळाली होती, जी 2,917 इतकी होती. तर, मतदारसंघानुसार विचार केल्यास लातूर ग्रामीणमध्ये 2019 मध्ये नोटाला सर्वात जास्त म्हणजे  27 हजार 500 इतकी मतं मिळाली होती. 


ठाकरे गटाच्या (Maharashtra Political Update News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना सहाव्या फेरीअखेर 21090 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून त्यांची आघाडी कायम  तर 4338 इतकी 'नोटा'ला मतं मिळाली आहेत. त्यामुळे लटके विरुद्ध 'नोटा' अशी लढत दिसून येत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंविरुद्ध नोटाचा सामना दिसत आहे. लटके आघाडीवर पण दुसऱ्या पसंतीची मतं नोटाला पडलेत.


दरम्यान, शिवेसेनच्या उमेदवार ऋतुजा लटके या आघाडीवर असल्याने  शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षानं माघार घेलल्यानं ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित झालाय. लटके मोठ्या मतांनी विजयी होतील, अशी विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.