Maharashtra Politics : महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, तसंच महागाई, बेरोजगारी आणि सीमावादाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadhi) 17 डिसेंबरला मोर्चा काढला जाणार आहे. महाविकास आघाडीने पुकारलेल्या महामोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली आहे असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीचा मोर्चा शांततेत व्हावा, लोकशाही मार्गाने विरोध करावा असं फडणवीस म्हणाले. कायदा सुव्यवस्था नीट राखली पाहिजे एवढ्यापुरताच सरकारचा हस्तक्षेप असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडीशी मोर्चाच्या मार्गासंदर्भात चर्चा झालीय. मार्गासंदर्भात कोणतीही अडचण नाही असं फडणवीस म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोर्चाला आंदोलनाने उत्तर
एकीकडे महाविकास आघाडीने उद्या महामोर्चाचं रणशिंग फुंकलं असताना भाजपने (BJP) माफी मांगो (Mafi Mango) आंदोलनातून त्याला प्रत्युत्तर देण्याची रणनीती आखलीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महाविकास आघाडी सातत्याने महापुरूषांचा अपमान करत आहे असा आरोप करत भाजप उद्या मुंबईभर माफी मांगो आंदोलन करणार आहे. उद्या मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघात भाजप आक्रमकरित्या माफी मांगो निदर्शनं करणार आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांनी माफी मागावी अशी मागणी आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली. 


शिवसेनेकडून जाणीवपूर्वक वाद 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला याचा वाद जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न उद्धव यांच्या शिवसेनेकडून सुरू आहे, आंबेडकर यांच्या जन्म स्थळाचा वाद निर्माण करुन अस्मानी नाही तर अफगाणी संकट आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांचा व्हीडिओ समाजमाध्यमावर येत आहे. संतांची,राम ,कृष्ण वारकरी संप्रदायाचा अपमान हा महाराष्ट्र द्रोह नाही का? हिंदूंचा अपमान करणारी व्यक्तव्य असताना मोर्चा कसले काढता असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र हे सहन करणारन नाही. हिंदू देवदेवतांची टिंगलटवाळी केली जात आहे, वारकरी संप्रदाायवर हल्ला आहे, याविरोधात माफी मांगो आंदोलन करणार असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं.


राऊतांना वाद निर्माण करण्याची अफगाणी सुपारी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा वाद संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष जाणीवपूर्वक निर्माण करत आहेत असा आरोप आशिष शेलार यांनी केलाय. राऊतांना वाद निर्माण करण्याची अफगाणी सुपारी मिळाली मिळालीय असा आरोप शेलारांनी केलाय. राऊतांनी बाबासाहेबांचं चरित्र वाचावं यासाठी भाई गिरकर यांनी त्यांना दोन पुस्तकं पाठवल्याचं शेलार म्हणाले.