Maharashtra Politics : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सोपवलं आहे. आता पक्ष आणि चिन्ह गेल्यानं ठाकरे गट (Thackeray Group) अडचणीत सापडलाय. ठाकरे गटाच्या आमदारांवर (Thackeray Group MLA) अपात्रतेची टांगती तलवार आहे. ठाकरे गटाचे 15 आमदार अपात्र ठरणार का? असा सवाल आता यानिमित्तानं उपस्थित होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची (CM Eknath Shinde) सूत्र हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबरोबर राहिलेल्या 15 आमदारांना कारणं दाखवा नोटीस जारी केली होती. त्यामुळे येत्या विधीमंडळ अधिवेशनात ठाकरे गटाच्या 15 आमदारांना अपात्र ठरवण्याचे स्पष्ट संकेत शिंदे गटाने दिले आहेत. शिवाय विधानसभा अध्यक्षही या गटाचेच आहेत, आणि अध्यक्षांना अशा प्रकारचा निर्णय घेण्याला सुप्रीम कोर्टही आडकाठी करु शकत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंबरोबर असलेल्या पंधरा आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. 


निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर झी २४ तासनं काही सवाल उपस्थित केलेत. 


उद्धव ठाकरेंबरोबरच्या आमदारांचं काय होणार?


शिवसेना शिंदेंची, मग ठाकरेंबरोबरचे आमदार अपात्र ठरणार का?


आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा व्हिप स्वीकारावा लागणार का ?


येत्या अधिवेशनात आदित्य ठाकरेंसह इतर आमदार अपात्र ठरणार का ?


उद्धव ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टात अपील केलं जाणार आहे. पण सुप्रीम कोर्टात या आमदारांना अपात्रतेपासून संरक्षण देणार का प्रश्न निर्माण होतो. दुसरीकडे 15 आमदारांना जेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी नोटीस बजावली होती त्यातून आदित्य ठाकरे यांना वगळण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने अपात्रतेची कारवाई होईल अशी शक्यता कमी आहे.