Weather Update : पावसाळ्यानंतर हिवाळा सुरु होणारे की उन्हाळा? राज्यातील तापमानवाढ पाहून सर्वांनाच पडला प्रश्न
Maharashtra Weather Update : पुढील 10 दिवसांत कसं असेल राज्यातील हवामान? हवमान विभागानं नागरिकांना दिला इशारा असून, वाढत्या तापमानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातून मान्सूननं काढता पाय घेतलेला असतानाच आता वातावरणात मोठे बहल होताना दिसत आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणाची जागा आता निरभ्र आभाळ आणि सूर्याच्या प्रखर किरणांनी घेतली आहे. तर, पावसामुळं निर्माण झालेला हवेतील गारवा आता कमी होत असून, आर्द्रतेचं प्रमाणही वाढलं आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील किमान 8 ते 10 दिवसांसाठी राज्यातील हवामानाच फारसे बदल होणार नसून, ऑक्टोबरमधील वाढलेल्या तापमानाचा दाह काही केल्या कमी होताना दिसणार नाहीये. त्यामुळं नागरिकांना घराबाहेर पडण्यापूर्वी वाढत्या तापमानाचा अंदाज घेण्याचा सल्लाही सध्या देण्यात येत आहे.
हवामान विभागाचे वरिष्ठ अनुपम काश्यपी यांच्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढचे काही दिवस मान्सूनचा लवलेष दिसणार नसून, परतीच्या पावसानं आचा महाराष्ट्राची वेस ओलांडल्याचं स्पष्ट होत आहे. ज्यामुळं 10 दिवसांत तापमानवाढ होणार असून, त्यानंतर तापमानात काहीशी घट नोंदवली जाणार आहे. थोडक्यात हिवाळ सुरु होण्यासाठी आणखी काही वेळाची प्रतीक्षा आपल्या सर्वांनाच करावी लागणार आहे.
तापमानाचा आकडा तिशीपार...
सध्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान 34 अंशांवर पोहोचलं असून, मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि कोकण पट्ट्यामध्ये तापमान 33 अंश नोंदवलं गेलं आहे. तिथं विदर्भात तापमानाचा आकडा 35 अंशावर पोहोचला आहे. सध्याची उष्णता अल निनोचा प्रभाव असून, मान्सूनच्या वाऱ्यांनी महाराष्ट्र सोडून आता बरंच अंतरम मागं टाकलं असल्याची बाब लक्षात येत आहे.
हेसुद्धा वाचा : Bihar Train Accident : नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस अपघातात चौघांचा मृत्यू; घटनास्थळाचा हादवणारा व्हिडीओ समोर
मान्सूनचे वारे बरेच दूर गेल्यामुळं आता हवेतील बाष्पाचं प्रमाण कमी होत असून, सूर्यकिरणं थेट जमिनीवर येत आहेत. परिणामी भारतीय उपखंडात तापमानवाढीची नोंद केली जात आहे.
देशातील काही राज्यांत पावसाची हजेरी
सध्या अनेक राज्यांमध्ये ऑक्टोबर हिट सुरु झाली असली तरीही काही राज्यांमध्ये मात्र पावसाची हजेरी असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. जेव्हाजेव्हा मान्सून उशिरानं माघार घेतो तेव्हा तेव्हा अशा पद्धतीची वातावरणनिर्मिती होते. आयएमडीच्या माहितीनुसार 14 ते 17 ऑक्टोबरदरम्यान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर, नागालँड, मिझोराम आणि मणिपूरमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये हिमवृष्टीची दाट शक्यता असल्यामुळं नागरिकांना या हवामान बदलात काळजी घ्यावी असं आवाहन यंत्रणा करत आहेत.