मुंबई : कोरोनाच्या वाढता प्रभाव पाहता आगामी काळात वैद्यकीय उपकरणांची सर्वाधिक गरज लागणार आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या उपचारादरम्यान व्हेंटिलेटरची तीव्र गरज लागणार आहे अशी माहिती समोर आली होती. याबाबत महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने पुढाकार घेऊन माहिती दिली होती. आता त्यांच्याकडून खूप सकारात्मक बाब समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिंद्रा आणि महिंद्रा या वाहन निर्मिती करणाऱ्या कंपनीने खूप महत्वाचं पाऊल उचललं आहे. महिंद्राच्या इगतपुरी आणि मुंबईतील कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनचा सदुपयोग करून व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. 



महामारीच्यावेळी व्हेंटिलेटरची सर्वाधिक गरज लागते. ५ ते १० लाखांपासून व्हेंटिलेटरची सुरूवात होते. यामुळे अनेकदा रूग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवणं टाळलं जातं आणि त्यांचा जीव आणखी धोक्यात येतो. यावर महिंद्रा कंपनीने पुढाकार घेऊन तोडगा काढला आहे. महिंद्राच्या दोन ठिकाणच्या टीमने अवघ्या ४८ तासांत व्हेंटिलेटर तयार केले आहेत. याबाबत महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं आहे. 'आम्ही एका आयसीयू वेंटिलेटरच्या स्वदेशी निर्माता कंपनीसोबत काम करत आहोत. '