गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मुंबईच्या मालाडमध्येही पश्चिम येथील नारियलवाला कॉलनी परिसरात  झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला. सकाळी साडे सहा वाजता पूजा करण्यासाठी मंदिरात जात असणाऱ्या 38 वर्षीय शैलेश राठोड यांच्या अंगावर झाड कोसळलं. याविषयी महानगरपालिकाकडे इमारतीमध्ये राहणाऱ्या महेश पांड्या यांनी झाड धोकादायक असल्याची तक्रार 24 एप्रिल रोजी केली होती. तरी देखील याकडे महानगरपालिका कडून दुर्लक्ष केल्यामुळे या तरुणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे वारंवार घटना होऊन देखील महापालिकेकडून याकडे लक्ष का दिले जात नाही. असा प्रश्न नागरिक करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या २ दिवसापासून वाऱ्यामुळे अनेक झाडे पडल्य़ाची घटना मुंबईमध्ये घडली होती. पण आज झाड पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. २ वर्षात आतापर्यंत जवळपास १८ वेळा झाडे पडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.