Measles Outbreak : मुंबईत गोवरचा 15 वा बळी, चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू
Measles Outbreak in Maharshtra : राज्यात गोवरने चिंता वाढवली आहे. गोवरचा उद्रेक वाढत असताना मुंबईत गोवरचा आणखी एक बळी गेला आहे.
Measles Outbreak in Mumbai : राज्यात गोवरने चिंता वाढवली आहे. गोवरचा (Measles ) उद्रेक वाढत असताना मुंबईत गोवरचा आणखी एक बळी गेला आहे. ( Measles Outbreak ) चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 10 नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या 457 वर पोहोचली आहे. (Marathi Latest News)
मुंबईतील कुर्ला येथे एका चार वर्षांच्या चिमुकलीचा गोवरमुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील गोवरबळींची संख्या 15वर गेली आहे. काल दिवसभरात मुंबईत गोवरचे 10 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे गोवरच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. दरम्यान, एक चिंताजनक बातमी आहे. गोवर रुग्णांपैकी एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. मुंबई शहर तसंच उपनगरांतील वेगवेगळ्या रुग्णालयांत काल दिवसभरात 40 रुग्ण दाखल झालेत तर 35 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत.
( हेही वाचा - पालकांनो इकडे लक्ष द्या ! गोवरने चिंता वाढवली, काळजी घ्या...)
राज्यात गोवरचा (Measles) प्रसार वेगाने होत आहे. कोरोनाच्या (Covid 19) वेगाच्या पाचपटीने हा संसर्ग राज्यभरात पसरत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ही समस्या लक्षात घेत गोवरच्या नियंत्रणासाठी आता लस मोहीम (Measles Vaccination) हाती घेण्यात आलेय.
राज्यात मुंबईसह मालेगाव, भिवंडी, ठाणे, वसई विरार, पनवेल, नवी मुंबई, औरंगाबाद, पिंपरी चिंचवड, बुलढाणा, मीरा भाईंदर, रायगड, जळगाव, धुळे ही ठिकाणं गोवरसाठी संवेदनशील असल्याचं सांगण्यात येत आहे. (Measles Latest News) त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांनी मास्क वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.