Measles Outbreak in Maharashtra : राज्यात तब्बल 121 ठिकाणी गोवरचा उद्रेक झाला आहे. ( Measles Outbreak ) काल दिवसभरात 15 गोवर रूग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात आता एकूण गोवर रूग्णांची संख्या 940 एवढी झाली आहे. राज्यात काल आढळलेल्या 15 रूग्णांपैकी 6 रुग्ण मुंबईतले आहेत. मुंबईत गोवर एकूण रूग्णसंख्या 442 झाली आहे. राज्यात मुंबईसह मालेगाव, भिवंडी, ठाणे, वसई विरार, पनवेल, नवी मुंबई, औरंगाबाद, पिंपरी चिंचवड, बुलढाणा, मीरा भाईंदर, रायगड, जळगाव, धुळे ही ठिकाणं गोवरसाठी संवेदनशील असल्याचं सांगण्यात येत आहे.
एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना 500 रुग्ण महिनाभरात झाले. गोवरमुक्त पालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार मागील महिन्याभरात 500 पेक्षा जास्त रुग्ण गोवरमुक्त झाले आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये गोवरमुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दररोज साधारण 30 रुग्णांना दवाखाण्यातून घरी सोडविण्यात येत आहे.
राज्यात गोवरचा (Measles) प्रसार झपाट्याने झालाय. कोरोनाच्या (Covid 19) वेगाच्या पाचपटीने हा संसर्ग राज्यभरात पसरत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ही समस्या लक्षात घेत गोवरच्या नियंत्रणासाठी आता लस मोहीम (Measles Vaccination) हाती घेण्यात आलेय तसेच सुरक्षिततेसाठी लहान मुलांना मास्क बंधनकारक करण्याचे संकेत देण्यात आले आहे.
गोवरचा धोका वाढला आहे. मुंबईत अनेक बालकं गोवरबाधित आढळली असून 12 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गोवरचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी मुलांना मास्क बंधनकारक करण्याचे संकेत दिलेत. गोवरबाधितांच्या थुंकीतून हा आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लहान मुलांचं गोवरच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी मास्कची मदत होईल, असं मत गोवर प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केले.