मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचा प्रसार होत आहे. परदेशातून आलेल्या व्यक्तिंमुळे कोरोनाचा फैलाव झाला आहे. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची माहिती प्रसारित करु नये असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोरोनाबाबत अफवा फसरवू नये असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसवर कोणतेही औषध नाही. मात्र, कोरोनाच्या नावाखाली औषध देण्यात येईल असे फलक लावण्यात आले आहेत. वसईत कोरोनावर उपचार करण्याच्या नावाखाली दोन डॉक्टरांनी औषध देण्याचे फलक लावलेत. याप्रकरणी दोन्ही डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नालासोपारा आणि वसई मध्ये  डॉक्टरांनी आपल्याकडे करोना विषाणूवर प्रतीबंधात्मक उपाय म्हणून औषधे उपलब्ध असल्याचे फलक नालासोपारा आणि वसईच्या परिसरात लावले होते. अशा दोन डॉक्टरांवर नालासोपारा व तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आपती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार अफवा पसरविणे आणि जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेश भंग केल्या प्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहे. 


कोरोनाच्या रुग्णांची माहिती सोशल मीडियावर माहिती प्रसारित केल्याप्रकरणी चार जणांवर अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात तीन जणांवर आणि तोफखाना पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुंबई जवळच्या वसईत कोरोना व्हायरसबाबत औषध विकणाऱ्या दोन डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसवर जगात कुठेही औषध उपलब्ध नाही. असे असताना औषध देण्याखाली लूट होत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत.