Mhada Homes Latest Update : हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. पण, प्रत्येक वेळी हे स्वप्न साकार होतंच असं नाही. घर घ्यायचं म्हटलं की, आर्थिक पाठबळ असणं ही सर्वात मोठी आणि तितकीच महत्त्वाची बाब. घरासाठीची अनामत रक्कम भरण्यापासून घराचं कर्ज आणि त्याच्या डागडुजीसाठी किंवा त्यामध्ये काही नवे बदल घडवून आणण्यासाठीचे बदल करण्यासाठीही होणाऱ्या खर्चामुळं अनेक गणितं बिघडतात.  (Mhada Lottery 2024)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता किमान या हिशोबामुळं घराचं स्वप्न दूल लोटावं लागणार नाहीय. कारण, या स्वप्नपूर्वीसाठी पुन्हा एकदा म्हाडाची मोठी मदत होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार राज्यातील सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी म्हाडा आता 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 13 हजार 46 घरं बांधणार आहे. थोडक्यात तितक्याच मंडळींचं स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे. 


म्हाडाच्या वतीनं या घरांच्या बांधणीसाठी तब्बल 8310 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असून, पुणे, मुंबई, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर इथं प्रादेशिक मंडळांमध्ये ही घरं उभारण्यात येणार आहेत. कमी दरात म्हाडाकडून ही घरं उपलब्ध करून दिली जात असल्यामुळं सामान्यांकडूनही या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. 


हेसुद्धा वाचा : Air India च्या प्रवाशाची  'हॉरर स्टोरी'; 500000 रुपयांच्या तिकिटावर मिळाली घाणेरडी सीट, अर्धवट शिजलेलं जेवण आणि... 


दरम्यान, या घरांसाठीसुद्धा म्हाडाकडून येत्या काळात सोडत काढली जाणार आहे. अर्जदारांची संख्या पाहता यंदाच्या टप्प्यात घरांचा आकडाही मोठा असल्यानं अनेकांच्या स्वप्नांना नवी भरारी मिळणार हे नक्की. म्हाडाच्या वतीनं मुंबईत 3660, पुण्यात 1506, कोकणात 5122 घरं उभारण्यात येणार आहे. यासाठी अनुक्रमे 5326.87 कोटी रुपये, 473.78 कोटी रुपये आणि 1460.15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हाडाकडून येत्या काळात घरांचा हा महत्त्वाकांक्षी टप्पा गाठण्यासाठीच्या कामाला सुरुवात झाली असून, आता सोडतीच्या तारखा केव्हा जाहीर होतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.